पुणे प्रवाह न्युज पोर्टल
चंकी पांडेचा पहिला मराठी चित्रपट
'विकून टाक'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठी वाहिनीवर!
सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येते. १६ ऑगस्टला सोनी मराठी वाहिनीवर 'विकून टाक' या विनोदी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. विनोदातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, समीर चौघुले, ऋजुता देशमुख, हृषीकेश जोशी, जयवंत वाडकर, वर्षा दांदले आणि चंकी पांडे यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत.
'विकून टाक' या चित्रपटात चंकी पांडे यांची एक विनोदी भूमिका असून ते एका शेखची व्यक्तिरेखा साकारत आहेत. गेली अनेक वर्षं चंकी पांडे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत विविध व्यक्तिरेखा साकारून नावलौकिक मिळवला आहे. चंकी पांडे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
सोनी मराठी वाहिनीवर १६ ऑगस्ट, रविवारी चंकी पांडे यांचा पहिला मराठी चित्रपट 'विकून टाक' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वा. होणार आहे.