ओरिफ्लेमची नवीन ऑनकलर रेंज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


मुंबई, २ ऑगस्ट २०२०: थेट विक्री करणा-या अग्रगण्य स्विडिश ब्युटी ब्रँड असलेल्या ओरिफ्लेमचा विश्वास आहे की, स्वत:ला मोकळेपणाने व्यक्त करण्यातच सौंदर्य आहे. कारण खरे सौंदर्य कधी मिळवता येत नाही तर जपणूक होऊ शकते. हाच विश्वास दृढ करण्याच्या दृष्टीने ब्रँडने आजच्या आत्मविश्वासू आणि उत्साही महिलांच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करण्याकरिता ऑल आइज पॅलेट, क्रीम लिपस्टिक आणि पॉवर अप फौंडेशन सारखी उत्पादने लाँच करून ऑनकलर रेंजमध्ये विस्तार केला आहे.


 


दीर्घकाळ प्रभावासाठी तयार केलेले नवे ऑन कलर ऑल आइज पॅलेट हे आठ निवडक आणि रंगद्रव्ययुक्त छटांमध्ये डोळे आणि भुवयांसाठी मॅट आणि सेमी शिमर फिनिशिंगमध्ये उपलब्ध आहे. स्मोकी आय लुकसाठी हे उत्पादन कसे वापरायचे यासाठीच्या इन बॉक्समधील सूचनांचा वापर करून शेड्सचे मिश्रणही करता येईल. त्यामुळे तेजस्वी लुकसाठी तयार रहा. ऑनकलर क्रीम लिपस्टीक हे सहा नव्या क्रिमी आणि उत्साहवर्धक छटांमध्ये फिकट तपकिरी पासून जांभळ्या रंगात उपलब्ध आहे.


 


नवे ओसी बुलेट, क्रीम कंफर्ट कॉप्लेक्स अशी वैशिष्ट्ये असलेली ही क्रीम, उत्साही रंगातील लिपस्टीक मुलायमतेचा अनुभव प्रदान करते. प्रेमाने भारलेल्या ओठांसाठीही अधिक खुलवण्याची सुनिश्चिती यातून मिळते. प्रत्येक छटा व्हायब्रंट पिगमेंट ब्लेंडने तयार झाली असून याद्वारे सर्व प्रसंगांसाठी योग्य परिपूर्ण रंग प्राप्त करता येतो.


 


आपल्या त्वचेला ऑनकलर पॉवर अप फाउंडेशनद्वारे ऊर्जामयी करा. जेणेकरून या दिवसातील व्यग्र, मेक इट हॅपन अशी पार्श्वभूमी तयार होते. समृद्ध रंगद्रव्यांसह हे फाऊंडेशन मिडियम कव्हरेज देते. तसेच परिपूर्ण त्वचेचे स्वरुप मिळवण्यात मदत करते. पौष्टिक शिया बटर असलेले हे उत्पादन सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. ऑनकलर पॉवर अप फाउंडेशन हे लाट पोर्सलेन, नॅचरल बीज आणि वार्म आयव्हरी या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
आय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
मा. श्री. गौतम जैन सामाजिक कार्यकर्ते यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image