शिकाऊ अनुज्ञप्तीची वैधता संपुष्टात आलेल्या      उमेदवारांकरीता वाढीव कोटा उपलब्ध 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


शिकाऊ अनुज्ञप्तीची वैधता संपुष्टात आलेल्या 


    उमेदवारांकरीता वाढीव कोटा उपलब्ध 


 


पुणे दि. 18 : - महाराष्ट्रात संपूर्ण टाळेबंदी लागू झाल्याने बहुतांशी उमेदवारांच्या पक्के अनुज्ञप्ती करिताच्या चाचणी झालेल्या नाहीत. या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्तीची वैधता संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने या उमेदवारांकरीता वाढीव कोटा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित होते. 


          त्यानुसार दिनांक 17 ऑगस्ट 2020 पासून पक्के अनुज्ञप्तीच्या चाचणी कोटा वाढविण्यात येत आहे. हा वाढीव कोटा दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजता उपलब्ध होईल. 


   वाढीव कोटयाप्रमाणे LMV (Tr) पूर्वीचा कोटा 24 वाढविण्यात आलेला कोटा 24 , LMV (Cab) पूर्वीचा कोटा 12 वाढविण्यात आलेला कोटा 12, 3W (GV) पूर्वीचा कोटा 24 वाढविण्यात आलेला कोटा 24, 3W (Cab) पूर्वीचा कोटा 15 वाढविण्यात आलेला कोटा 15, LMV (NT) पूर्वीचा कोटा 36 वाढविण्यात आलेला कोटा 36, Trans पूर्वीचा कोटा 06 वाढविण्यात आलेला कोटा 06, MCWG पूर्वीचा कोटा 42 वाढविण्यात आलेला कोटा 90, MCWOG पूर्वीचा कोटा 18 वाढविण्यात आलेला कोटा 39, OTHERS पूर्वीचा कोटा 03 वाढविण्यात आलेला कोटा 03, Adpth Veh पूर्वीचा कोटा 01 वाढविण्यात आलेला कोटा 01 याप्रमाणे पूर्वीचा एकूण कोटा 181 तर वाढविण्यात आलेला एकूण कोटा 286 इतका असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,पिंपरी –चिंचवड,पुणे यांनी कळविले आहे.


                                            0 0 0 0


Popular posts
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
Image
न्यू आर्या फाऊंडेशनच्यावतीने समाजाला आधार देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Image
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील
Image
💃🏻*Traditional Kanchipuram at its finest and most classic
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image