गायाने उत्पादन श्रेणीचा विस्तार केला ~ उत्तम व आरोग्यदायी ए२ तूप केले लाँच 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



मुंबई, १८ ऑगस्ट २०२०: देशातील अग्रगण्य हेल्थ आणि वेलनेस ब्रँड गायाने ए२ हे गायीचे दूध लाँच केले आहे, जे सामान्य तुपाच्या तुलनेत अधिक आरोग्यदायी आणि उत्कृष्ट आहे. हे उत्पादन देशातील २५ राज्यांतील १२०० पेक्षा जास्त प्रीमियम आउटलेटवर उपलब्ध आहे. लवकरच ते अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह इतर अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. ए२ गायीच्या तुपाच्या लाँचिंगमुळे ब्रँडची उत्कृष्ट आरोग्याप्रतीची वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे. या श्रेणीद्वारे गायाच्या सध्याच्या आरोग्यदायी खाद्य उत्पादने आणि न्युट्रिशनल सप्लीमेंटला नवा आयाम मिळेल.


 


अ जीवनसत्व आणि आवश्यक फॅटी अॅसिडयुक्त गाया ए२ गायीचे तूप सामान्य तुपाला उत्कृष्ट नैसर्गिक पर्याय आहे. साहीवाल आणि राठी या दोन गायीच्या भारतीय प्रजातीचे ए२ हे दूध असून त्यापासूनचे तूप पारंपरिक पद्धतींनी तयार करण्यात आले आहे. या प्रक्रियेत शुद्धता व सर्व आवश्यक घटकांची काळजी घेण्यात आली आहे. फॅटी अॅसिड आणि ए२ बेटा-कॅसिनयुक्त हे तूप पचवण्यास हलके आणि आरोग्यदायी आहे. तसेच यामुळे कोलेस्टरॉलची पातळी वाढत नाही. याद्वारे सामान्य प्रतिकारशक्ती वाढते व हे केटो-फ्रेंडलीदेखील आहे.


 


गायाची पालक कंपनी कॉस्मिक न्यूटराकोस सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका आणि संचालिका डॉली कुमार यांनी सांगितले की “ ग्राहक आमच्या उत्तम गुणवत्तेच्या उत्पादनांवर जो विश्वास ठेवतात, त्याच्याशी आम्ही तडजोड करू शकत नाहीत. आम्ही त्यांना असे उत्पादन देत आहोत, ज्याची गुणवत्ता सामान्य तुपात मिळू शकत नाही. उत्तम जेवण हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, यावर विश्वास ठेवणा-या ग्राहकांसाठीच गाया ए२ गायीचे दूध तयार करण्यात आले आहे.”


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image