देवदासींन महिलांना किराणा वस्तूंचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पी एन फाउंडेशन तर्फे माजी आमदार व थोर सामाजिक कार्यकर्ते कै वसंतराव थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोरोना मुळे आर्थिक अडचणीत असलेल्या देवदासी महिला ना बुधवार पेठेत अखिल बुधवार पेठ, देवदासी संस्थेच्या कार्यालयात किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भोला वांजळे, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थे चे अध्यक्ष डॉ प्रकाश यादव, पी एन फाउंडेशन चे अध्यक्ष समीर निरवणे, उपाध्यक्ष तुषार गंभीर, सचिव प्रवीण पवार,कार्याध्यक्ष संजय राणे, सुरेश कांबळे उपस्थित होते याप्रसंगी श्री वांजळे म्हणाले की कै थोरात यांनी आपल्या सामाजिक कार्याने आपल्या सामाजिक बांधिलकी जपली आणि समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला