जम्बो कोविड रुग्णालयाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल पुणे दि 23: येथील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा घेतला.


 


   यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, मनपाचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 


विभागीय आयुक्त राव यांनी उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयातील साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सुविधांच्या उपलब्धतेबाबत चर्चा केली.