अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*


मुंबई, दि. 16 :- माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकनेते होते. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक होते. संसदीय लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून त्यांनी राजकारण केलं. विरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल श्रद्धा, आदर होता. ते महान लेखक होते. पत्रकार होते. संवेदनशील कवी होते. त्यांचं नेतृत्वं, वक्तृत्वं, दातृत्वं असामान्य होतं. देशाच्या या सर्वकालिन महान नेतृत्वाच्या स्मृतीदिनानिमित्त माझे विनम्र अभिवादन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन केलं आहे.


०००००००