अरुण भालेराव यांचे निधन- दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या विद्यार्थी पालकत्त्व योजनेतील संस्कार वर्गाचे प्रमुख

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विद्यार्थी पालकत्व योजनेतील संस्कार वर्गाचे प्रमुख अरुण श्रीधर भालेराव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. 


महाराष्ट्र फायनान्स अकाऊंट सर्व्हिसेस मध्ये त्यांनी ३२ वर्षे नोकरी केली. रा. स्व. संघाचे कार्यकर्ते व अनेक सामाजिक संस्थांचे ते सल्लागार होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उपक्रमांपैकी विद्यार्थ्यांशी निगडीत असलेल्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. गणेशोत्सवात ॠषीपंचमीच्या दिवशी असलेल्या महिलांच्या सामुहिक अर्थवशिर्ष पठणाच्या शिस्तबद्ध कार्यक्रमाचे नियोजन ते आणि त्यांच्या पत्नी शुभांगी भालेराव या गेली ३० वर्षे करीत होत्या. 


 


जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्कारीत करण्याचे काम ते अनेक वर्षांपासून करीत होते. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे व सर्व विश्वस्तांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 


 


* फोटो - अरुण भालेराव