पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर  माजी सैनिक कामगार युनियनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर यांचे " आमरण उपोषण भिकमांग आंदोलन "

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


पुणे महानगरपालिकेमध्ये सुरक्षा विभागामध्ये कार्यरत असलेले माजी सैनिक कर्मचाऱ्यांना


 


मासिक वेतन न मिळाल्याने व उपचार घेण्यास उशीर झाल्या कारणाने मृत्यू झालेल्या माजी सैनिक व


 


इतर कर्मचारी यांना न्याय मिळणे कामी


 


पुणे महानगरपालिकेमध्ये सुरक्षा विभागामध्ये कार्यरत असलेले माजी सैनिक कर्मचारी यांना वर्षानुवर्षे मासिक वेतन देत नाही . वेळेवर मासिक वेतन न मिळाल्याने व उपचार घेण्यास उशीर झाल्या कारणाने मृत्यू झालेल्या माजी सैनिक व इतर कर्मचारी यांना न्याय मिळणे कामी पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर माजी सैनिक कामगार युनियनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर हे आमरण उपोषण भिकमांग आंदोलन करीत आहे .


 


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व राज्य शासनानुसार ७१ माजी सैनिक कर्मचारी यांना तातडीने कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे . ज्या कामासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक केली तेच काम सदर कर्मचारी याना देण्यात यावे . स्थायी समितीची मंजुरी असूनही मनमानी करून कर्मचाऱ्यांचे वेतन मधून कपात केलेल्या युनियनचा खर्च ६ महिन्याला १५०० रुपये प्रमाणे तसेच प्रवास भत्ता दरमहा १००० रुपये प्रमाणे कपात केलेली रक्कम तातडीने देण्यात यावी . यापुढे देखील दर महा सदर रक्कम कपात न करण्याची हमी देण्यासाठी सहकार्य करावे , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम करणारे माजी सैनिक कर्मचाऱ्याप्रमाणे दरमहा २५००० रुपये पुणे महानगरपालिकेमध्ये माजी सैनिक कर्मचाऱ्यांना देखील दरमहा मासिक वेतन २५००० रुपये प्रमाणे देण्यात यावे . पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे माजी सैनिक कर्मचारी यांना पी एफ व ई एस आय चा भरणा करण्याचा आदेश देण्यात यावा .


 


हे सर्व माजी सैनिक कर्मचारी प्रलंबित प्रश्न पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त , कामगार अधिकारी , उपआयुक्त , सामान्य प्रशासन विभाग , कायदा सल्लागार , पुणे महानगरपालिकेचे खाते प्रमुख , सुरक्षा विभाग यांच्या सोबत माजी सैनिक कामगार युनियनच्या शिष्टमंडळासोबत एकत्र बैठक घेऊन माजी सैनिक कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यावे . अशी मागणी माजी सैनिक कामगार युनियनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर यांनी निवेदनाद्वारे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे .


 


सोबत - पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना दिलेली निवेदन प्रत जोडली आहे .