शेअर बाजारातील सलग चार सत्रातील घसरणीला ब्रेक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


~ निफ्टी १.८७% तर सेन्सेक्सची ७४८ अंकांनी वृद्धी ~


 


मुंबई, ४ ऑगस्ट २०२०: एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि मारुती सुझुकीया स्टॉक्समधील नफ्याच्या बळावर आज शेअर बाजारातील निर्देशांक हिरव्या रंगात स्थिरावले. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्सने ८०६ अंकांनी वृद्धी घेत मजबूत स्थान मिळवले. तर निफ्टी ५० ने देखील ११,११२ अंकांच्या उंचीला स्पर्श केला. निफ्टी १.८७% ची वृद्धी घेत ११,०९५ अंकांवर स्थिरावला. तर बीएसई सेन्सेक्स ७४८ अंकांच्या वाढीसह ३७,६८७.९१ अंकांवर थांबला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की विस्तारीत बाजारात एसअँडपी बीएसई मिडकॅप निर्देशांक १ टक्क्यांनी वाढून स्थिरवला. तर एसअँडपी बीएसई स्मॉलकॅप १.२३ टक्क्यांनी वाढला. एच-वन बी व्हिसावरील सर्व विदेशी कामगारांना नोकरीवर ठेवण्यासाठी करार किंवा उपकरार करण्यावर फेडरल एजन्सींनी बंदी आणावी, या आदेशावर आज अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर सर्व आयटी स्टॉक्स आज लाल रंगात बंद झाले. यानंतर एनएसईवरील आयटीचा निर्देशांक १.५८ टक्क्यांनी घसरून १७,७४३.६५ वर स्थिरावला.


 


एचडीएफसी बँक: बँकेचे स्टॉक्स आज ४ टक्क्यांनी वाढले व त्यांनी १,०४१ रुपयांवर व्यापार केला. या खासगी क्षेत्रातील कर्जदाराने आदित्य पुरी यांचा वारसदार म्हणून सशीधर जगदीशन यांचे नाव घोषित केल्यानंतर हे परिणाम दिसून आले. श्री पुरी यांच्या वारसदाराचे नाव हाच मागील वर्षातील चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा होता. नव्या व्यक्तीला श्री पुरी यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे आव्हान आहे.


 


वॉकहार्ट: कंपनीचे शेअर्स सलग तिस-या दिवशी वाढले. बीएसईवर आज हा स्टॉक १० टक्क्यांच्या अप्पर सर्किट बँडसह ३३४ रुपयांवर स्थिरावला. ब्रिटिश सरकारसोबत कंपनीचा एक करार होणार असून याद्वारे अॅस्ट्रा झेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात विकसित होणा-या मल्टीपल कोव्हिड-१९ चे कोट्यवधी डोस पुरवले जातील, अशी माहिती आज कंपनीने दिली.


 


टाटा मोटर्स: टाटा मोटर्सचे स्टॉक्स आज १.४६% नी घसरले व त्यांनी १११.४० रुपयांवर व्यापार केला. देशांतर्गत प्रवासी वाहन व्यवसायातील ४९ टक्के वाटा विक्रीला काढणार असल्याचे वृत्त कंपनीने नाकारल्यानंतर हे परिणाम दिसून आले.


 


कच्चे तेल: कच्च्या तेलाचे दर मंगळवारी जगात नव्या कोव्हिडच्या लाटेच्या चिंतेने घसरले. एमसीएक्स, क्रूडचे दर २.२९% नी घसरून ३२३० रुपयांवर स्थिरावले.


 


जागतिक बाजार: दिएगो आणि बायरच्या नाकारात्मक कमाईच्या वृत्तामुळे युरोपियन बाजार मंगळवारी उदासीन स्थितीत सुरु झाले. हे वृत्त लिहिताना, युरोनेक्स्ट १०० चे शेअर्स ०.०५ टक्क्यांनी घसरले तर स्विस मार्केट निर्देशांक ०.६६ टक्क्यांनी घसरलेल्या स्थितीत होता