पुणे विद्यापीठात स्वातंत्र्यदिन संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



 


पुणे. दिनांक १५ ऑगस्ट २०२०:


         सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 74 वा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते मुख्य इमारतीच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कुलगुरूंनी उपस्थितांना संबोधित केले. मंत्रिमंडळात नुकतेच मंजूर झालेल्या शैक्षणिक धोरणात नाविण्यपुर्ण अनेक बाबींचा समावेश असल्यामुळे त्यांनी याचे स्वागत केले. जग कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या सावटाखाली कठीण परिस्थितीतून जात असताना आपणही त्या संकटाचा सामना करत वाटचाल करत आहोत आणि या संकटाच्या काळात सर्वजण योध्दा म्हणून कार्य करीत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.


 


          यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी अतुल पाटणकर, परीक्षा मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे याशिवाय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाते, अधिसभा सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. 


कोरोना विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता, आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या संकेत स्थळावर करण्यात होते.