प्रसिध्द गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने " याद - ए - रफी...." या सुरेल कार्यक्रमाद्वारे महान गायक महम्मद रफी यांना आदरांजली वाहण्यात आली.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या षष्टब्दीपूर्तीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 


आणि 



पुणे लष्कर भागात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कोरोना योद्धा सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सफाई कामगारांना शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटिका (पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ ) तसेच शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस किर्तीताई फाटक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेना चित्रपट सेनेचे सहचिटणीस श्री. मंगेशदादा चंद्रमौर्य, अॅड. रेहमान खान, फारूख खान, अमित सुबंध , इरफान मूजावर, अरविंद चव्हाण, राहुल ससाणे, पोलीस प्रतिनिधी (लष्कर विभाग) राजाभाऊ सोनवणे, स्वराज्य ग्रुपचे संचालक रणजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी "मोहम्मद रफी फेम गायक" कैलाशकुमार, माला मरोठीया,नितीन कुमार,शैलेश कुमार आदींनी गाणी सादर केली.


ह्या कार्यक्रमाचे आयोजन श्री. मंगेश चंद्रमौर्य यांनी केले होते.