सदाशिव पेठेत निनाद पुणे तर्फे गुढया उभारुन आनंदोत्सव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सदाशिव पेठेत निनाद पुणे तर्फे गुढया उभारुन आनंदोत्सव


 


पुणे : निनाद पुणे आणि कलातीर्थ पुणेच्या वतीने अयोध्या येथील भव्य राम मंदीर भूमीपूजन समारंभानिमित्त गुढी उभारुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खुन्या मुरलीधर चौकामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने ओळखल्या जाणा-या अटल कट्टा येथे हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी दीपोत्सव करुन भीमरुपी म्हणून तसेच प्रभू रामचंद्राची आरती करण्यात आली. 


 


सनई चौघडयांच्या गजरात हा कार्यक्रम झाला. कारसेवक व पुणेकरांच्या हस्ते आरती झाली. भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री व कारसेवक रवी अनासपुरे, परेश मेहेंदळे, विवेक संत, बाळा मेथे, किशोर जोगदेव, मनोहर ओक, काका देशपांडे, संजय गोखले, महेंद्र अनासपुरे, चंदू मेहेंदळे या कारसेवकांच्या हस्ते आरती झाली. माजी नगरसेवक उदय जोशी, रामलिंग शिवणगे, अनिल गानू, अ‍ॅड.वैजनाथ विंचूरकर, किशोर खैराटकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.