डॉ . क्षीरसागर, डॉ दळवी, मेट्रन नवगिरे, असिस्टंट मेट्रन झडे, सिस्टर स्मॉल, सि. काळे, विशाल पाडळे, अनिकेत, सिस्टर जोशी व इतर कामगारांना गौरविण्यात आले.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोवीड १९ या महासंकट काळात काम करत असलेल्या डॉक्टर , परिचारिका, आया, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट , प्रयोगशाळा सहाय्यक, सफाई कर्मचारी याचा ख्रिस्ती नवनिर्माण सेवा या सामाजिक संघटनेकडून प्रमाणपत्र देऊन कोविड १९ योद्धाचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानित


 


पुणे कॅम्प भागातील गोळीबार मैदान जवळील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालय येथे कोवीड १९ या महासंकट काळात काम करत असलेल्या डॉक्टर , परिचारिका, आया, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट , प्रयोगशाळा सहाय्यक, सफाई कर्मचारी याचा ख्रिस्ती नवनिर्माण सेवा या सामाजिक संघटनेकडून प्रमाणपत्र देऊन कोविड १९ योद्धा चा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .


 


 या वेळेस संघटनेचे संस्थापक दिपक चक्रणारायण व शिलोह चर्चचे पास्टर रॉबीन महाडकर , खजिनदार आनंद साळवे , ऱिबेका गोरे, निलेश नायडू, अविनाश चक्रनारायण, विशाखा राठोड, नितेश नायडू उपस्थित होते.


 



 


पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्ल्भभाई पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड , डॉ. उदय भुजबळ , डॉ. भास्कर वारे व डॉ सुचिता गंडाकूश डॉ . क्षीरसागर, डॉ दळवी, मेट्रन नवगिरे, असि मेट्रन झडे, सिस्टर स्मॉल, सि. काळे, विशाल पाडळे, अनिकेत, सिस्टर जोशी व इतर कामगारांचा " कोरोना यौद्धा " म्हणून सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला .


 


सूत्रसंचालन अविनाश चक्रनारायण यांनी तर आभार निलेश नायडू यांनी केले.