देशी स्टार्टअप 'ट्रेल'ला टीअर २ शहरांतून वाढता प्रतिसाद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


देशी स्टार्टअप 'ट्रेल'ला टीअर २ शहरांतून वाढता प्रतिसाद


 


~ २० दशलक्ष नव्या यूझर्सनी नोंदणी केली ~


 


मुंबई, २१ जुलै २०२०: भारत सरकारने ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर लाइफस्टाइल ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्रेलवर यूझर्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. यावर यूझर्सना त्यांच्या मूळ भाषेत ओरिजनल कंटेंट व्हिडिओ तयार करता येतात. या प्लॅटफॉर्मवर टीअर १ आणि टीअर २ शहरांतील ५ दशलक्षांपेक्षा जास्त नवे कंटेंट निर्माते वाढले. प्लॅटफॉर्मवरील ६२ % पेक्षा जास्त सक्रिय यूझर्स टीअर-२ शहर आणि त्याबाहेरील आहेत. चिनी अॅपवरील बंदीनंतर ट्रेलची १० पटींनी वाढ झाली असून एकूण यूझर बेस ४५ दशलक्षांपेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. प्लॅटफॉर्मवरील काही प्रमुख शहरांमध्ये लखनऊ, चंदीगड, जयपूर, म्हैसूर, विशाखापट्टणम, गुवाहाटी, गोवा यांचा समावेश आहे. सध्या मंचावर ४५ दशलक्ष+ डाऊनलोड्स तसेच २० दशलक्ष+ मासिक अॅक्टिव्ह यूझर्स आहेत. 


 


यूझर्स हा कंटेंट कसा तयार करतात आणि कसा वापरतात याबद्दल देशातील विविध भागांनी स्वारस्य दर्शवले आहे. उत्तरेकडी भाग आणि ईशान्येकडील शहरांमध्ये वैयक्तिक काळजी, फॅशन आणि खाद्य यांच्यात समान स्वारस्य आहे. दक्षिण गोलार्धातील यूझर्स पाककृती, गॅझेट्स आणि योगाबद्दल (आरोग्य आणि तंदुरूस्ती) पसंती दर्शवतात. पश्चिमेकडील पुरूष आणि महिला त्वचेची काळजी आणि फॅशनचा कंटेंट वापरतात. या प्लॅटफॉर्मवर यूझर्सना इंटरफेसद्वारे बक्षीसे, वस्तू आणि सुटी साजरी करण्याच्या सुविधाही मिळतात.


 


ट्रेलचे सह संस्थापक पुलकित अग्रवाल म्हणाले, “ आमचा समुदाय वाढत आहे, वाढवला जात आहे, त्यामुळे आमच्या यूझर्सना समविचारी प्रेक्षकांसोबत लाइफस्टाइल टिप्स, स्टोरीज आणि अनुभव शेअर करण्याचा अतुल्य अनुभव मिळावा, याची सुनिश्चिती करणे, हे आमचे सध्याच्या टप्प्यातील उद्दिष्ट आहे. आम्ही तीव्र स्वारस्य आणि उत्साही कंटेंट निर्मात्यांचा समुदाय तयार करण्यावर तसेच त्यांच्या प्रेक्षकांना एकाधिक भारतीय भाषांमध्ये कंटेंट तयार करण्यावर आमचा भर आहे. याद्वारे यूझर्सना अधिक चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य माहिती आणि योग्य खरेदीचे निर्णय घेणे सोपे जाईल”