आषाढी एकादशी "हरित वारी... आपल्या दारी" उपक्रमातून एक वृक्ष लागवड करून साजरी करूया : संजोग वाघेरे पाटीलपिंपरी ३० जून  


 


 


 


कोरोना व्हायरसमुळे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी पायी न जाता एसटीने पंढरपूरला नेण्यात आल्या. राज्यातून अनेक मानाच्या पालख्या आणि मोजक्याच भाविकांना आषाढी एकादशीला पंढरी नगरीत एकत्र येणार आहेेत. पंढरपुरात आषाढी एकादशीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक व भाविकांनी आपल्या दारात, परिसरात व प्रभागात एक वृक्ष लावा आणि त्यात पांडूरंग पाहावा. "हरित वारी... आपल्या दारी" उपक्रमांद्वारे विठ्ठलरूपी वृक्षलागवड करून आषाढी एकादशी साजरी करावी असे आवाहन पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.


 


 


 


दरवर्षी लाखो भाविक आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पायीवारी स्थगित करण्यात आली आहे. यंदा कोरोनामुळे अनेक वारकऱ्यांची आषाढी वारी चुकली असली तरी यावर्षीच्या वारीची आठवण म्हणून "हरित वारी... आपल्या दारी" उपक्रमांद्वारे १००१ तुळशी झाडांचे वाटप व शहरात विविध ठिकाणी १० हजार झाडेेे लावण्याचा संकल्प पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या उपक्रमात पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी "विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड" करुन 'श्री विठ्ठल दर्शना'सह आषाढी एकादशी साजरी करावी असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.