उमरोलीतील डिकसळ शांतीनगर येथे कचऱ्याचा ढीग, घंटागाडी गायब, दुर्गंधीने ग्रामस्थ हैराण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


कर्जत दि. 11 गणेश पवार


 


           कोरोना विषाणूमुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. या विषाणूला रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. मात्र स्वच्छता व सामाजिक अंतर राखून या विषाणूला रोखता येऊ शकते. मात्र कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील या उलट चित्र आहे. गेले 9 दिवस डिकसळ शांतीनगर येथील कचऱ्याचा ढीग साचून पडला आहे परंतु घंटागाडी गायब आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


              कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्गावर असलेल्या गाव मिळून उमरोली ग्रुप ग्रामपंचायत बनली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील डिकसळ शांतीनगर भागात असलेल्या कचराकुंडीत कचरा जमा होऊन तब्बल 9 दिवस उलटून गेले आहेत. मात्र गावातील कचरा उचलणार घंटागाडी गायब झाली आहे. गेले 9 दिवस गावात घंटागाडी फिरली नसल्याने येथील कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे त्यातून दुर्गंधी येउन ती संबंध परिसरात पसरली आहे. या भागातून वाटचाल करताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. तसेच या अगोदर देखील ग्रामपंचायत हद्दीत घंटागाडी वेळेवर येत नसल्याचे तक्रार नागरिक वारंवार ग्रामपंचायतीत करत आले आहेत. मात्र ग्रामपंचायत याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूमुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. सर्वत्र ग्रामपंचायतीकडून स्वच्छता राखून जंतुनाशक फवारणी देखील करण्यात येत आहे. अशा स्थितीत उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील चित्र उलट असल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. तेव्हा लवकरात लवकर ग्रामपंचायतीने येथील कचरा उचलून गावात स्वच्छता राखावी अशी मागणी जोर धरत आहे.


 


 


चौकट


 


          घंटागाडीवरील चालक दोन दिवस आला नाही त्यामुळे गावातील कचरा उचलण्याचे व्यवस्थापन कोलमडले आहे. लवकरच चालकाची व्यवस्था करून कचरा उचलला जाईल अशी व्यवस्था आम्ही करत आहोत.


: विनोद चांदोरकर, ग्रामविकास अधिकारी, उमरोली ग्रामपंचायत


 


उमरोली ग्रामपंचायत हद्दीत अनेकदा कचरा साठून त्यातून दुर्गंधी येऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करण्याची घटना घडल्या आहेत. वारंवार ग्रामपंचायतीत तक्रारी करून देखील हीच परिस्थिती कायम आहे. कोरोना महामारीचा काळ सुरू आहे. तेव्हा स्वच्छता राखली गेली पाहिजे. याकरिता ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याचे व्यवस्थापन त्यांच्या स्तरावर करावे. अन्यथा आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल.


किशोर गायकवाड, रायगडभूषण, सामाजिक कार्यकर्ते


 


फोटो ओळ


संग्रहित छायाचित्र


छाय गणेश पवार


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image