कुकू एफएमने प्रसिद्ध हिंदी लेखक अमित खान यांच्याशी करार केला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

मुंबई, १७ जुलै २०२०: देशातील अग्रगण्य बहुभाषिक ऑडियो प्लॅटफॉर्म कुकू एफएमने प्रसिद्ध हिंदी लेखक, स्तंभकार आणि स्क्रीनरायटर अमित खान यांना टपरी टेल्स सेगमेंटसमध्ये समाविष्ट केले आहे. या भागीदारीअंतर्गत त्यांच्या १० कथा पुढील काही महिन्यांमध्ये कुकू एफएमच्या माध्यमातून प्रसारीत केल्या जातील. १०० पेक्षा जास्त कादंब-या प्रकाशित झालेले अमित खान हे भारतातील सर्वाधिक वाचल्या जाणा-या हिंदी क्राइम कादंबरीकारांपैकी एक आहेत.

अमित खान टपरी अॅपमध्ये प्रतिभावंत हिंदी स्क्रिप्ट आणि पुस्तक लेखकांसह टपरी अॅपमध्ये फ्री मंथली सेशनदेखील करतील. जेणेकरून कथा लिहिण्याची कला आणखी चांगल्याप्रकारे समजून घेता येईल. पहिल्या सेशनमध्ये कुक्कू एफएमद्वारे १० लेखकांना लेखन कौशल्य, आकर्षक कथा लिहिणे, कॅरेक्टर बिल्डिंग, कथेची टाइमलाईन यासारख्या विषयांवरील चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. जेणेकरून ते वाचकांच्या मनाला भिडणा-या कथा लिहू शकतील. यासह अमित खान हे लेखन क्षेत्रातील कुकू एफसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करिअर करणे तसेच आपल्या कथा मार्केट-रेडी कशा करता येतील, यावर मार्गदर्शन करतील.

कुकू एफएमचे सह संस्थापक आणि सीईओ लालचंद बिसू म्हणाले की, “४२.२ कोटी हिंदी श्रोत्यांसह देशात हिंदी सामग्रीसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आहे. तर दुसरीकडे नवोदित लेखक माध्यम आणि योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांचे पर्याय मर्यादित असून मोजक्याच लेखकांना प्रकाशन संस्था आणि सीरियल किंवा वेबसिरीजच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये संधी मिळते. कुकू एफएममध्ये आम्ही लेखकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत. याच्या मदतीने ते आपले लेखन जास्तीत जास्त लेखकांपर्यंत पोहोचवू शकतील. तसेच हिंदी लेखक आणि वाचकांदरम्यानचे अंतर कमी होईल. अमित खान हिंदी थ्रिलर नॉव्हेलच्या जगात खूप लोकप्रिय आहेत. आम्ही त्यांच्यासोबत भागीदारी करून भारतातील भावी तरुण फिक्शन लेखकांना नाव कमावण्याची संधी देऊन आनंदी कुकू एफएमने प्रसिद्ध हिंदी लेखक अमित खान यांच्याशी करार केला

मुंबई, १७ जुलै २०२०: देशातील अग्रगण्य बहुभाषिक ऑडियो प्लॅटफॉर्म कुकू एफएमने प्रसिद्ध हिंदी लेखक, स्तंभकार आणि स्क्रीनरायटर अमित खान यांना टपरी टेल्स सेगमेंटसमध्ये समाविष्ट केले आहे. या भागीदारीअंतर्गत त्यांच्या १० कथा पुढील काही महिन्यांमध्ये कुकू एफएमच्या माध्यमातून प्रसारीत केल्या जातील. १०० पेक्षा जास्त कादंब-या प्रकाशित झालेले अमित खान हे भारतातील सर्वाधिक वाचल्या जाणा-या हिंदी क्राइम कादंबरीकारांपैकी एक आहेत.

अमित खान टपरी अॅपमध्ये प्रतिभावंत हिंदी स्क्रिप्ट आणि पुस्तक लेखकांसह टपरी अॅपमध्ये फ्री मंथली सेशनदेखील करतील. जेणेकरून कथा लिहिण्याची कला आणखी चांगल्याप्रकारे समजून घेता येईल. पहिल्या सेशनमध्ये कुक्कू एफएमद्वारे १० लेखकांना लेखन कौशल्य, आकर्षक कथा लिहिणे, कॅरेक्टर बिल्डिंग, कथेची टाइमलाईन यासारख्या विषयांवरील चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. जेणेकरून ते वाचकांच्या मनाला भिडणा-या कथा लिहू शकतील. यासह अमित खान हे लेखन क्षेत्रातील कुकू एफसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करिअर करणे तसेच आपल्या कथा मार्केट-रेडी कशा करता येतील, यावर मार्गदर्शन करतील.

कुकू एफएमचे सह संस्थापक आणि सीईओ लालचंद बिसू म्हणाले की, “४२.२ कोटी हिंदी श्रोत्यांसह देशात हिंदी सामग्रीसाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आहे. तर दुसरीकडे नवोदित लेखक माध्यम आणि योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांचे पर्याय मर्यादित असून मोजक्याच लेखकांना प्रकाशन संस्था आणि सीरियल किंवा वेबसिरीजच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये संधी मिळते. कुकू एफएममध्ये आम्ही लेखकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत. याच्या मदतीने ते आपले लेखन जास्तीत जास्त लेखकांपर्यंत पोहोचवू शकतील. तसेच हिंदी लेखक आणि वाचकांदरम्यानचे अंतर कमी होईल. अमित खान हिंदी थ्रिलर नॉव्हेलच्या जगात खूप लोकप्रिय आहेत. आम्ही त्यांच्यासोबत भागीदारी करून भारतातील भावी तरुण फिक्शन लेखकांना नाव कमावण्याची संधी देऊन आनंदी आहोत.”आहोत.”