मुख्यमंत्री सहाय्यता  निधी”साठी सायकलिंग असोसिएशनतर्फे एक लाखाचा निधी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ६१व्या वाढदिवसानिमीत्त सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (CAM) च्यावतीने “ मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९” साठी रुपये १,०५,०००/- (रुपये एक लाख पाच हजार) निधीचा धनादेश अजितदादा पवार यांच्याकडे नुकतेच पुणे येथील विधान भवनामध्ये झालेल्या एका बैठकीदरम्यान सुपूर्त करण्यात आला.


 


या निधीमध्ये सायकलिंग अससिएशनच्या जिल्हा संघटना आणि काही सायकलपट्टूंनी संकलन केले आहे. सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र नेहमीच आपली सामाजीक जबाबदारी ओळखून विविध उपक्रम राबवित असते तसेच आपले खेळाडू आणि सभासदांनासुद्धा या जबाबदारीची जाणीव करुन देत असते असे कौतुकोद्गार माननीय अजितदादांनी याप्रसंगी काढले.


 


कोरोना मुळे निर्माण झालेल्या जागतीक महामारीसारख्या कठीण प्रसंगामधून महाराष्ट्र जात असताना सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून केलेले हे कार्य क्रीडा क्षेत्रामधील सर्व संघटनांना दिशा देणारे असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्रातील सायकलपट्टूंनी गत तीन वर्षात आपल्या कामगिरीत केलेल्या प्रगतीचे कौतुक करुन महाराष्ट्रातील सायकलपट्टूंना आगामी काळात आवश्यक त्या सर्व सुविधा व सोयी देण्याचे आश्वासन माननीय अजितदादांनी दिले.


 


या कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योगपती आणि एमआयटी विश्व शांती विद्यापिठ सीआयएपीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) प्रविणजी पाटील, सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे खजिनदार प्रताप जाधव, असोसिएशनचे सचिव प्रा. संजय साठे, कोल्हापूर जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजीत मोहिते, सदस्य भूषण प्रताप जाधव आदी मान्यवर हजर होते.


Popular posts
संग्राम शेवाळे यांनी विद्यार्थी प्रश्नांसाठी शिष्टमंडळसोबत मा.राज्यपाल महोदय यांची भेट घेतली
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
*एक वेळ अवश्य भेट द्या* *मराठा वधू-वर* *सूचक केंद्र* *बालिंगे, गगनबावडा रोड, कोल्हापूर ४१६०१०*
Image
महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळाचा विस्तार
Image
पुण्यातून कलाकार आणि विविध संघटनेची मागणी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांना च आमदार या पदावर नियुक्ती करण्यात यावी
Image