सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात 


अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध  


 


पुणे - दिनांक १३ जुलै २०२०


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ ऑगस्ट २०२० या महिन्यात होणे अपेक्षित आहे. ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने (Online Mode) अर्ज मागविण्यात येत आहेत. 


अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


यासाठी पुढीलप्रमाणे विद्यार्थी अर्ज करू शकतात : 


दिनांक १३ जुलै २०२० ते २० जुलै २०२० पर्यंत (नियमित शुल्कासह)


दिनांक २१ जुलै २०२० ते २५ जुलै २०२० पर्यंत (विलंब शुल्कासह)


 


  पदवी/पदविका प्रमाणपत्र मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच २० जुलै २०२० पासून "Supplementary Convocation Degree Certificate" ही लिंक पदवीप्रदान समारंभ होईपर्यंत बंद राहील.  


  पदवीप्रदान समारंभ ऑनलाईन पद्धतीने योग्य ती काळजी व सामाजिक अंतर राखून आयोजित करण्यात येईल. त्यामुळे प्रमाणपत्रांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची पदवी/पदविका प्रमाणपत्र त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यांवर स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात येतील, अशी माहिती पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक, डॉ. महेश काकडे