लघु, मध्यम उद्योगांच्या व्यवसाय सुलभतेकरिता ट्रेडइंडियाचा पुढाकार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


~ 'कोव्हिड -१९ इसेन्शियल एक्स्पो इंडिया २०२०'चे करणार आयोजन ~


 


मुंबई, २१ जुलै २०२०: कोव्हिड-१९ मुळे देशातील लघु आणि मध्यम उद्योगांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या संकटाचे व्यवसायाच्या संधीत रुपांतरीत करण्यासाठी देशातील सर्वात मोठे बी2बी मार्केटप्लेस ट्रेडइंडिया जागतिक खरेदीदार आणि विक्रेत्यांना विश्वासू बिझनेस पार्टनर शोधण्याची संधी देत ५ ते ७ ऑगस्ट २०२० दरम्यान देशातील पहिला व्हर्चुअल ट्रेडशो ‘कोव्हिड-१९ इसेंशियल एक्सपो इंडिया’चे आयोजन करत आहे. एसएमई आणि एमएसएमईंना त्यांचा व्यवसाय सुरळीत चालण्यात मदत करणे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. कोव्हिड-१९चा फैलाव पाहता व्हर्चुअल शोचे आयोजन करण्यात आले असले तरीही पारंपरिक प्रदर्शनाच्या धर्तीवरच तो आयोजित केला जाईल.


 


या साथीच्या काळात आवश्यक सामग्रीची मागणी वेगाने वाढली आहे, बाजारात अशी सामग्री विक्री करणा-या कंपन्यांची संख्याही वाढली आहे, ज्या नूतनाविष्कारासोबत सामान विक्री करत आहेत. कंपन्यांना उत्पादन विकासाविषयी नाविन्यपूर्ण मार्गर्शन करण्यासह सध्याच्या परिस्थितीनुसार महसूलाचे इतर मार्ग शोधणे,हा या कार्यक्रमामागील हेतू आहे.


 


एक्स्पोमध्ये विविध ब्रँड्स सहभागी होतील, जे व्हर्चुअली कमी किंमत आणि उत्तम दर्जा असलेली उत्पादने आणि विविध प्रकारचे समाधान सादर करू शकतील. या एक्सपोमध्ये थ्रीडी स्टॉल्सदेखील असतील. तेथे उत्पादने व्हर्चुअली पाहिली जातील आणि माहितीसाठी प्रदर्शकाशी चॅट आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधता येईल.


 


ट्रेड इंडियाचे सीओओ श्री संदीप छेत्री यांनी सांगितले की, 'एकिकडे कोव्हिड-१९ ने उद्योग आणि अर्थव्यवस्थेला कमकुवत केले आहे तर दुसरीकडे नव्या शक्यतांची द्वारेही खुली केली आहेत. जगभरातील बिझनेस ऑफलाइनकडून ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. त्यांच्या कार्यप्रणातीलही महत्त्वाचे बदल करत आहेत. ट्रेडइंडियामध्ये आम्ही एसएमई आणि एमएमएमईची स्थिती सुधारण्यासाठी डिजिटल बिझनेस मॉडेल बनवण्यात मदत करत आहोत. जेणेकरून ते या लँडमार्क व्हर्चुअल ट्रेड शोच्या माध्यमातून त्यांचा बिझनेस डिजिटली आणखी चांगला बनवू शकतील.'


Popular posts
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
आय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
Shri Sharad Pawar on his 80 Birth-day at his residence Silver Oaks in Mumbai. To personally give the news of an award from U.S.A on the occasion of his Birth-day celebrations
आनंद नगर झोपडपट्टी येथे गुन्हेगारी रोखने, गाड्या जाळणे, पेट्रोल चोरणे असले कांड थांबविणे तसेच महीला सुरक्षीतते करीता सि. सि.टी.ब्ही. ७ दिवसात बसवुण देणे बाबत. अन्यथा राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी महीला आघाडी देणार आयुक्तांना भाऊबीज ची भेट बांगड्या
Image