शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात तेजीने

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


~ निफ्टी ३४.६५ तर सेन्सेक्सने ९९.३६ अंकांनी वाढला ~


 


मुंबई, १३ जुलै २०२०: आजच्या व्यापारी सत्रात बँकिंग सेक्टर वगळता बेंचमार्क निर्देशांकांनी सकारात्मक स्थितीत व्यापार करत आठवड्याची सुरुवात तेजीने केली. आयटी, ऊर्जा, धातू आणि एफएमसीजी स्टॉक्नी बाजाराला गती देण्यास मदत केली. निफ्टी ०.३२% किंवा ३४.६५ अंकांनी वाढून तो १९,८०२.७० अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.२७% किंवा ९९.३६ अंकांनी वाढला व त्याने ३६,६९३.६९ अंकांवर विश्रांती घेतली.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १११० शेअर्सनी नफा कमावला, १७५ शेअर्स स्थिर राहिले तर १५४३ शेअर्सनी मूल्य गमावले. टेक महिंद्रा (५.५४%), हिंडाल्को इंडस्ट् (३.७९%), एचसीएल टेक्नोलॉजीज (३.७४%), जेएसडब्ल्यू स्टील (३.२६%), आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (३.२३%) हे आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर दुसरीकडे पॉवर ग्रिड (२.२०%). एचडीएफसी बँक (१.९५%), बजाज फायनान्स (२.१०%), एचडीएफसी (१.७२%) आणि आयसीआयसीआय बँक (१.७२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप यांनी आज फ्लॅट व्यापार केला.


 


बायोकॉन लिमिटेड: देशात आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी इटोलिझुंबा इंजेक्शन बाजारात आणण्यासाठी बायोकॉन कंपनीला डीजीसीआयची परवानगी मिळाली. या इंजेक्शनचा वापर मध्यम ते गंभीर कोव्हिड-१९ ची लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाईल. कंपनीच्या शेअर्समध्ये ०.१७ टक्क्यांची वाढ होऊन तिच्या शेअर्सनी ४१५.०० रुपयांवर व्यापार केला.


 


आरआयएल: रिलायन्स इंडस्ट्रिजचे लिमिटेडचे शेअर्स ३.२३% नी वाढले व त्यांनी १९३८.७० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने क्वॉलकॉमकडून जिओ प्लॅटफॉर्मवर ०.१५% भागीदारीसाठी ७३० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. त्यानंतर हे परिणाम दिसून आले.


 


 


 


आजच्या व्यापारी सत्रात भारतीय रुपयाचा व्यापार फ्लॅट झाला आणि त्याने अस्थिर देशांतर्गत इक्विटी बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ७५.१९ रुपयांचे मूल्य गाठले. आजच्या सत्रात कच्च्या तेलाचे दर कमी झाले. अमेरिका आणि जगातील इतर भागात कोव्हिड-१९ रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने हे परिणाम दिसून आले.


 


जगातील अनेक भागात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढूनही गुंतवणूकदार कमाईच्या हंगामाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही युरपियन बाजारासह जागतिक बाजाराने वृद्धी दर्शवली. नॅसडॅकने ०.६६%, तर एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० कंपनीने अनुक्रमे ०.७१% व १.१९% ची वृद्धी दर्शवली. निक्केई २२५ चे शेअर्स २.२२% तर हँगसेंगचे शेअर्स ०.१७% नी वाढले.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image