आई माझी काळुबाई' मालिकेत 'प्राजक्ता गायकवाड' साकारणार आर्याचं पात्र

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



     


'आई माझी काळुबाई' ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमो मधून ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे हे कळतंय. आर्या म्हणजेच 'प्राजक्ता गायकवाड' हा नवा चेहरा सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या आधी प्राजक्ता गायकवाड हिला ऐतिहासिक भूमिकेमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे पण एका कॉलेज मधल्या तरुणीची भूमिका पहिल्यांदाच ती करत आहे. या भूमिकेसाठी तिने थोडे वजन कमी केलं आहे इतकंच नाही तर स्वतःची स्टाईल आणि लूक सुद्धा प्राजक्ताने या भूमिकेसाठी बदलेल आहे.


       'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. प्राजक्ताला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचा चाहतावर्ग देखील उत्सुक आहे. प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या वयाची भूमिका साकारत आहे. आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. 'गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळुबाईच्या शक्तीची' पाहा 'आई माझी काळुबाई' लवकरच आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.