भारतीय बाजाराचा उच्चांकी व्यापार; निफ्टी १०७.७० तर सेन्सेक्स ४०८.६८ अंकांनी वधारला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


मुंबई, ९ जुलै २०२०: वित्तीय आणि मेटल स्टॉक्सनी आधार दिल्यामुळे बेंचमार्क निर्देशांकाने आजच्या व्यापारी सत्रात उच्चांकी कामगिरी दर्शवली. निफ्टी १.०१% किंवा १०७.७० अंकांनी वाढून तो १०,८०० च्या पुढे झेपावत १०,८१३.४५ अंकांवर स्थिर झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील १.१२% किंवा ४०८ अंकांनी वाढून ३६,७३७६९ वर थांबला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, आजच्या व्यापारी सत्रात जवळपास १४२५ शेअर्सनी नफा कमावला तर १४६ शेअर्स स्थिर राहिले. तसेच १२४६ शेअर्स घसरले. हिंडाल्को इंडस्ट्रीज (६.५८%), एसबीआय (४.१४%), बजाज फायनान्स (३.८१%), टाटा स्टील (३.२३%) आणि एचडीएफसी (४.२६%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती इन्फ्राटेल (१.९४%), कोल इंडिया (१.५४%), टेक महिंद्रा (१.२०%), ओएनजीसी (०.९८%) आणि हिरो मोटोकॉर्प (०.८५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. एफएमसीजी सेक्टर वगळता इतर सर्व निर्देशांकांनी आज हिरव्या रंगात व्यापार केला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे ०.०७% आणि ०.४९% ने वाढले.


 


देशांतर्गत इक्विटी बाजारात भारतीय रुपयाने आजच्या व्यापार सत्रात मागील तीन दिवसातील घसरण सुरूच ठेवली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्याने ७४.९९ रुपये मूल्य गाठले.


 


जगभरात कोव्हिड-१९ विषाणू रुग्णांच्या संख्येतील वाढ आणि चीनसोबतच्या वाढत्या तणावांमुळे आजच्या व्यापारी सत्रात जगातिक बाजारपेठेत संमिश्र संकेत दिसून आले. एफटीएसई एमआयबी ०.६१% नी तर एफटीएसई १०० चे शेअर्स ०.६५% नी घसरले. त्यामुळे युरोपियन बाजारात घसरण दिसून आली. तर दुसरीकडे मोठ्या कंपन्यांनी नवे उच्चांक दर्शवल्याने नॅसडॅकचे शेअर्स १.४४% नी वाढले. निक्केई २२५ चे शेअर्स ०.४० टक्क्यांनी तर हँग सेंगचे शेअर्सदेखील ०.३१% नी वाढले


Popular posts
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
Image
न्यू आर्या फाऊंडेशनच्यावतीने समाजाला आधार देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Image
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील
Image
💃🏻*Traditional Kanchipuram at its finest and most classic
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image