दत्तात्रय उर्फ बाळासाहेब गोविंद घैसास यांचे निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुणे, दिः 25 जुलैः शहरातील सुप्रसिद्ध व्यवसायिक दत्तात्रय उर्फ बाळासाहेब गोविंद घैसास यांचे वृद्धपकाळाने आज निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात, 3 मुले, सुना, नातवंडे व पतवंडे असा परिवार आहे.


सुप्रसिद्ध नाक, कान व घसा तज्ञ डॉ. सुरेश घैसास यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. दत्तात्रय घैसास आजारी असतांना म्हणाले की मला कोणत्याही प्रकारे औषधोपचार नको, माझ्या आई-वडिलांनी मला बोलविले आहे. मला आनंदाने जाऊ दया.


दत्तात्रय उर्फ बाळासाहेब गोविंद घैसास यांनी त्यांच्या युवाअवस्थेत बुलेटवरून संपूर्ण भारत भ्रमण केले होते. तसेच त्यांनी डेक्कन व लक्ष्मी रोड येथे जे. जे. घैसास कंपनी चालवित होते.


माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, उपाध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, सचिव प्रा.डॉ. मंगेश तु. कराड व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नागरे यांनी श्रध्दांजली वाहिली.


त्यावेळी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, घैसास कुटुंबांनी माईर्स एमआयटी या शिक्षण संस्थेला एक पैसाही न घेता जमीन दिली. त्यातूनच माईर्स एमआयटी या शिक्षण संस्थेची उभारणी झाली. त्यामध्ये त्या घैसास कुटुंबांचे मोलाचे योगदान आहे. त्यावरून त्यांचा मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्यांच्या निधनामुळे आमची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच परमेश्वराकडे प्रार्थना.


 माईर्स संस्थेच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहिली.