आपत्कालीन परिस्थितीत तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान करा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ : राजपूत सोशल वॉरियर्सतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन


 


पुणे : आपात्कालीन परिस्थितीत धावून जाणारा पहिला कार्यकर्ता गणेशोत्सवाचा असतो. राजपूत सोशल वॉरीयर्सने रक्तदान करुन ही परंपरा कायम ठेवीत पूर्व भागाचा लौकीक सुद्धा राखला आहे. कोरोनाच्या काळात रक्तदानाचा तुटवडा जाणवत असताना, तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान करायला हवे. सामाजिक संस्थांनी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करायला हवे, असे मत सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांनी व्यक्त केले.


 


राजपूत सोशल वॉरीयर्स, पुणेच्या वतीने स्व. झनकबाई ना. बढाई आणि स्व.मोहनराव गवंडी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौक येथे करण्यात आले होते. या शिबिरात १७१ वेळा रक्तदान केलेले महाराष्ट्र शासन परस्कृत राज्यस्तरीय रक्तकर्ण पुरस्कार विजेते किशोर गिरमे यांच्यासह पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, राम बांगड़,ललित खंडाळे, रवी सहाने, विश्वास मणेरे, नीलेश जोशी, दिनेश भिलारे, योगेश वाडेकर,यादव पुजारी, राजेंद्र काकड़े व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून शिबिरात सहभाग घेतला. किशोर रजपूत, शैलेश बढाई आणि स्वप्नील नाईक यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. यावेळी १८९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी नियमीत आणि जास्तीत जास्त वेळा रक्तदान करणाºया रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.


 


*फोटो ओळ : राजपूत सोशल वॉरीयर्स, पुणेच्या वतीने स्व. झनकबाई ना. बढाई आणि स्व.मोहनराव गवंडी यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौक येथे करण्यात आले होते.यावेळी नियमीत रक्तदान करणाºया रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.