मिलेनियल्स अॅपवर ट्रेडिंग करण्याला का पसंती देत आहेत? (सौजन्य: एंजल ब्रोकिंग)

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


संपू्र्ण भारतात मिलेनियल्सनी ट्रेडिंग सुरू केली आहे. त्यामुळे सिक्युरिटी आणि कमोडिटी बाजारात मिलेनिअल पिढीचा वाटा वेगाने वाढला आहे. बाजारात अस्थिरता असूनही या ट्रेंडमुळे आपला बाजार व्हॉल्यूमच्या दृष्टीने दररोज नवी उंची गाठत आहे. मात्र मिलेनियल्सना अचानक ट्रेडिंग करण्यासाठी कोण प्रेरित करत आहे? कदाचित हा बदल अचानक झालेला नाही.


 


एमची जादू: मनी, मिलेनियल्स आणि मोबाइल


 


मिलेनियल्सचा आपल्या पूर्वजांच्या तुलनेत तंत्रज्ञानाकडे अधिक कल आहे. यादृष्टीने हा बदल त्यांच्या गुंतवणुकीच्या सवयींमध्येही प्रतिबिंबीत होणे स्वाभाविक आहे. मिलेनियल्स मोठ्या संख्येने बाजारात सहभागी होत आहेत, यामागे बहुतेक मोबाइल हे प्रमुख कारण आहे. एक प्रकारच्या लवचिकतेसह प्रासंगिक निर्णय घेण्यासाठी रिअल टाइममध्ये स्टॉक टिप्स, रिसर्च आणि सल्ला मिळवण्यासाठी मोबाइल त्यांना सक्षम बनवत आहे. सध्या भारतातील अॅक्टिव्ह वर्कफोर्समध्ये ६४% सक्रिय भागीदारी मिलेनियल्सची आहे. वर्कफोर्समध्ये त्यांची हळू हळू वाढणारी भागीदारी ही शेअर बाजारात उच्च वाटा आणि योगदान देणारी ठरत आहे.


 


स्मार्टफोन: प्रवेशातील अडचणी दूर करणे आणि लवचिकता वाढवणे


ज स्मार्टफोनने भारतात नियमित रिटेल गुंतवणुकींतील प्रवेशाच्या अडचणी दूर केल्या आहेत. उदाहरणार्थ, शेअर बाजार शहरी भागापर्यंत मर्यादित राहण्यामागील एक पूर्वीचे कारण म्हणजे पोहोचण्याचे आव्हान होते. एका इच्छुक टिअर-२ किंवा टिअर-३ गुंतवणुकदाराला ट्रेडिंग फ्लोअरवर दुस-यासोबत उभे राहण्यासाठी पूर्वी अनेक अडचणींतून जावे लागत होते. दूरवरील भागात इंटरनेट कनेक्शन मिळवणे किंवा नाकी नऊ आणणा-या पेपरवर्कचा सामनाही करावा लागत असे. स्मार्टफोन आणि तंत्रज्ञान संचलित प्रक्रियांमुळे अशा प्रकारच्या सर्व आव्हानांवरील उपाय सापडला आहे. यामुळे जास्त गुंतवणूकदार इक्विटी मार्केटचा लाभ घेण्यासाठी सक्षम झाले आहेत.


 


घटत्या खर्चाचाही फायदा वाढला आहे


 


फुटफॉल वाढल्याने ब्रोकरेज फर्मदेखील हा लाभ गुंतवणुकदारांना देण्यास समर्थ झाल्या आहेत. अशा प्रकारचा लाभ त्यांच्या ग्राहकांना सवलतयुक्त ब्रोकरेज शुल्क आणि फ्लॅट शुल्काच्या रुपात मिळत आहे. ते एका गुंतवणुकदाराला तत्काळ निर्णय घेण्यास तसेच ब्रोकरेज चार्जवर कमी पैसे देण्याचा हक्क प्रदान करतात. फ्लॅट चार्जसह ब्रोकरेज चार्ज खूप कमी करून हाय व्हॉल्युमच्या ट्रेड्समध्ये ओव्हरहेड्सना स्ट्रीमलाइन केले जाते.


 


आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा अॅनालिटिक्स


 


सध्या इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपन्या मिलेनियल्स गुंतवणूकदारांचा लाभ अधिकाधिक वाढवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाहीत. तसेच त्यांनी हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी अल्ट्रा-मॉडर्न टेक्नॉलॉजी तैनात केली आहे. उदाहरणार्थ, आजकाल अग्रगण्य गुंतवणूक इंजिन हे एक गुंतवणूक सल्ला देण्यापूर्वी १ अब्जांपेक्षा जास्त डेटा बिंदूंची गणना करते. ते प्राधान्यक्रमासह पर्सनलायझेशनची सर्वोच्च पातळी राखत आणि व्यक्तींच्या जोखिमीच्या भूकेनुसार काम करते. या दृष्टीकोनामुळे गुंतवणदारांना बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेत अनेक पट रिटर्न मिळवण्याचा आनंद घेण्यास सक्षम बनवले आहे. पर्सनलायझेशन आणि ग्राहकांचे समाधान याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते.


 


यामुळे मिलेनियल्स आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून ट्रेडिंग करण्यास पसंती देत आहेत. ब्रोकरेज प्लॅटफॉर्म टिअर २ आणि ३ शहरांमध्ये आपल्या फुटप्रिंटचा विस्तार करत आहेत. हा ट्रेंड कदाचित नजीकच्या भविष्यात वाढणार आहे.