संत सावतामाळी महाराज यांच्या प्रतिमेस महात्मा फुले मंडळाचे उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित बुधवार पेठमधील संत सावतामाळी भवनमध्ये संत सावतामाळी महाराज यांच्या प्रतिमेस महात्मा फुले मंडळाचे उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. अंत्यत साध्या पध्दतीने व सामजिक अंतर राखून अभिवादन करण्यात आले. यावेळी सावता महाराज यांच्या प्रतिमेसमोर कांदा,मुळा भाजी ठेवण्यात आली.


यावेळी महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दिपक जगताप यांच्याहस्ते आरती करण्यात आली. तीर्थ प्रसादाचे वाटप महात्मा फुले वसतीगृहाचे व्यवस्थापक संतोष रासकर व कावेरी रासकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ज्योती मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर पैठणकर ,रमाकांत दरवडे व निर्मला जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.


संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित महात्मा फुले ब्रिगेडच्यावतीने हडपसर येथे संत सावतामाळी महाराज यांच्या प्रतिमेस महात्मा फुले ब्रिगेड पछिम महाराष्ट्र संघटक रोहिदास शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र साध्या पध्दतीने अभिवादन करण्यात आले.


यावेळी संदीप फासगे,प्रशांत फुले,मंगेश ससाणे,अजित ससाणे,पंकज दर्शीले आदी मान्यवर उपस्थित होते.