एमजी मोटर इंडियाद्वारे ६ आसनी इंटरनेट एसयूव्ही 'हेक्टर प्लस' लॉन्च

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


~ पॅनोरमिक सनप्रूफसह सुरुवातीच्या १३.४८ लाख रुपयांत उपलब्ध ~


 


मुंबई, १३ जुलै २०२०: एमजी (मॉरीस गॅरेज) मोटर इंडियाने आज १३.४८ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) सुरुवातीच्या मूल्यावर बहुप्रतीक्षित एमजी हेक्टर प्लस लाँच केली आहे. हेक्टर प्लस भारतातील पहिली ६ आसनी इंटरनेट एसयूव्ही असून ती पॅनोरमिक सनरूफसह येत आहे. तिची निर्मिती एमजी मोटरच्या गुजरात राज्यात वडोद-याजवळील हलोल येथील अत्याधुनिक निर्मिती प्रकल्पात केले जाईल.


 


एमजी हेक्टर परिवारातील नवा सदस्य असलेल्या या ६ आसनी हेक्टर प्लसमध्ये मधल्या रांगेत उत्कृष्ट आणि आरामदायी कॅप्टन सीट्स देण्यात आल्या आहेत. ६-सीटर एसयूव्ही ही नव्या ड्युएल-टोन स्मोक्ड सेपिया ब्राउन इंटेरिअरमुळे आतून खूप अपिलिंग लूक देते. नव्या स्टायलिश हेडलँप्ससह, एक नवे क्रोम-स्टडेड फ्रंट ग्रिल आणि आय-स्मार्ट नेक्स्ट जनरेशनसाठी चिट-चॅट फीचर यामुळे गाडीचे आकर्षण वाढले आहे. यात आणखी आकर्षक सुविधा असून त्यात नवे स्मार्ट स्वाइप, फ्रंट आणि रिअर बम्पर्स, न्यू रिअर टेल लाइट डिझाइन आणि रिवाइज्ड स्किड प्लेट्स आहेत.


 


एमजी हेक्टरप्रमाणेच एमजी मोटर इंडियाने ग्राहकांना हेक्टर प्लसच्या रिसेल व्हॅल्यूचे आश्वासन दिले आहे. यासाठी कारनिर्माता कंपनीने ‘कारदेखो’ सोबत करार केला आहे. कार खरेदी करणारे “3-60”योजनेअंतर्गत तीन वर्षांच्या मालकीनंतर एमजी हेक्टर प्लस ६०% च्या किंमतीत खरेदी करेल, जिला ग्राहक अधिक आकर्षक किंमतीत खरेदी करू शकतील.


 


एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “ आम्ही एमजी मोटरसह २०१९ मध्ये भारतीय वाहन बाजारात प्रवेश केला होता. एमजी हेक्टरप्लसचे लाँचिंग हे आमच्या प्रवासातील एक नवे यश आहे. ती टॉप-नॉच प्रॉ़डक्ट आणि सुविधांसह ग्राहकांच्या सेवेत कटिबद्ध आहे. ६ आसनी इंटरनेट एसयूव्ही ही आमच्या सर्व ग्राहकांना एक उत्कृष्ट कौटुंबिक आनंदक्षण प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान आधारीत उपलब्ध लक्झरी आणि कंफर्टचे मिश्रण आहे.”


 


एमजी हेक्टर प्लस आपल्या ग्राहकांना पुरेसा अनुभव प्रदान करण्यासाठी एमजी शील्ड आणि एमजी शील्ड+ प्रदान करते. एमजी शील्ड अंतर्गत, एमजी फ्री-तीन, ‘५एस’, म्हणजेच फ्री५-वर्ष/ अनलिमिटेड किमी वॉरंटी, फ्री ५-वर्षीय रोडसाइड असिस्टंस आणि पहिल्या ५ सर्व्हिससाठी फ्री लेबर चार्जचा विस्तार करण्यात आला आहे. ‘एमजी शील्ड’ अंतर्गत सर्व घटक एमजी ओनरशिपचा अनुभव वाढवणे तसेच एमजीच्या ग्राहकांना मन:शांती प्रदान करण्याच्या उद्देशाने दिलेले आहेत. ६ आसनी एसयूव्हीची टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप(टीसीओ) या सेगमेंटमध्ये सर्वात कमी आहे. ही पेट्रोल व्हेरिएंटसाठी ४५ पैसे प्रति किलोमीटर आणि डिझेल व्हेरिएंटसाठी ६० पैसे प्रति किलोमीटर (१००,००० किलोमीटर वापराच्या आधारे करण्यात आलेली मोजणी) आहे. एमजी हेक्टर प्लस क्लासिक पॅकेजचा भाग म्हणून ३ वर्षांसाठी ८,००० रुपयांपासून सुरु होणाऱ्या सर्वात चांगल्या प्रीपेड मेंटेनन्स प्लॅन सादर करते.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन