माईर्स एमआयटीतर्फे शांताबाई पवार यांना 51 हजाराची आर्थिक मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी दि. 26 जुलै 2020


 



 


पुणे, दिः26 जुलैः माईर्स एमआयटी, पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या स्मरणार्थ श्रीमती शांताबाई पवार यांना आर्थिक मदत म्हणून रोख 51 हजार रुपये त्यांच्या घरी जाऊन देण्यात आले. या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या पुढाकाराने ही आर्थिक मदत त्यांना देण्यात आली आहे.


श्रीमती शांताबाई पवार या 85 वर्षाच्या वयोवृध्द कलाकार असून त्या अनाथांसाठी आज ही कार्य करीत आहे. त्यांच्या पालन पोषणासाठी त्या रस्त्यावर डोंबारीचा खेळ करीत आहे. तसेच या वयातही युवकांना लाजवेल अशा प्रकारे लाठी चालवितात. परंतू कोरोनाच्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.


शांताबाई पवार यांनी ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीसारख्य बर्‍याच सेलीब्रेटीबरोबर काम करून देखील त्यांना पोट भरविण्यासाठी रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांनी हेमामालिनी यांच्याबरोबर सीता और गीता या चित्रपटामध्ये दोरीवरून चालण्याचा डोबार्‍याचा खेळ केला. तसेच त्रिशूळ या चित्रपटात साईड हिरोबरोबर काम केले आहे. तर श्रीदेवीबरोबर शेरणी चित्रपटामध्ये काम केले.


51 हजार रूपये स्विकारल्यानंतर शांताबाई पवार म्हणाल्या “आपल्या संस्थेनी मला केलेली आर्थिक मदतीबद्दल आपल्या संस्थेला व आपल्याला कोटी कोटी धन्यवाद.”  


प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की,“ तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात. ही दिलेली मदत ही दिवाळीची भेट आहे असे समजा. माझ्या ज्येष्ठ भगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांनी मला घडविले त्यांच्या संस्कारातून आपल्याला ही केलेली मदत आहे. त्याचा आपण स्विकार करावा. ”


जनसंपर्क अधिकारी,


माईर्स एमआयटी,पुणे


फोटो ः


माईर्स एमआयटी पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे श्रीमती शांताबाई पवार यांना 51 हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. त्या प्र्रसंगी डावी कडून संजय कैकाडे, शांताबाई पवार आणि आर.टी. रूईकर


माईर्स एमआयटी पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे श्रीमती शांताबाई पवार यांना 51 हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. त्या प्र्रसंगी डावी कडून संजय कैकाडे, अशोक बालगुडे, शांताबाई पवार आणि आर.टी. रूईकर