विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडून  मुख्यमंत्री सहायता निधीस 51 हजार रुपयांची मदत  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 


पुणे, दिनांक 30- कोरोना विरुद्धच्या लढयात समाजातील सर्वस्तरातील लोकांकडून, सामाजिक संस्थांकडून शासनाला सहकार्य मिळत असून आज मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.


                  विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या कोरोना प्रतिबंधक आढावा बैठकीवेळी हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


                                                      0 0 0 0 0