पुणे विभागातील 48 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



                             विभागात कोरोना बाधित 84 हजार 455 रुग्ण


                                                                  -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


  


    पुणे दि. 26 :- पुणे विभागातील 48 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 84 हजार 455 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33 हजार 649 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 921 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.


  यापैकी पुणे जिल्हयातील 68 हजार 686 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 41 हजार 399 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 617 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 17 हजार 736, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 528 व पुणे कॅन्टोंन्मेंट 175, खडकी विभागातील 50, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 33 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 95 रुग्णांचा समावेश आहे.  


                पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 181, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 291 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 90, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 44 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 662 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.27 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे.


 कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 50 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 95, सातारा जिल्ह्यात 125, सोलापूर जिल्ह्यात 233, सांगली जिल्ह्यात 166 तर कोल्हापूर जिल्ह्यात 431 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 98 रुग्ण असून 1 हजार 678 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 316 आहे. कोरोनाबाधित एकूण 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


  सोलापूर जिल्हयातील 7 हजार 67 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 727 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 906 आहे. कोरोना बाधित एकूण 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 493 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 987 आहे. कोरोना बाधित एकूण 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


  कोल्हापूर जिल्हयातील 4 हजार 111 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 189 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 823 आहे. कोरोना बाधित एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


 आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 21 हजार 538 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 15 हजार 908 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 178 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 31 हजार 75नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. 


 


( टिप :- दि. 26 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


0000


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image