इन्फिनिक्सने दमदार बॅटरी आणि ६.८२" डिस्प्लेसह लॉन्च केला ‘स्मार्ट 4 प्लस’

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, २३ जुलै २०२०: ट्रांशन होल्डिंग्सचा प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅंड इंफिनिक्सने नुकताच भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन स्मार्ट 4 प्लस लाँच केला. ६.८२ इंच स्क्रीन आणि तब्बल ६०००एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी असलेला हा फोन डिव्हाइसला दोन दिवसांचे पॉवर बॅक-अप देतो. मोठ्या बॅटरीचा स्टँडबाय टाइम ३१ दिवसांचा असून याद्वारे २३ तास नॉनस्टॉप व्हिडिओ प्लेबॅक, ३८ तास ४जी टॉकटाइम, ४४ तास म्युझिक प्लेबॅक, २३ तास वेब सर्फिंग आणि १३ तास गेमिंग प्रदान केले जाते. हा फोन ओशन वेव्ह, व्हायोलेट आणि मिडनाइट ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध असून फ्लिपकार्टवर ७९९९ रुपयांना २८ जुलैपासून उपलब्ध होईल.


 


अँड्रॉइड १० आधारित एक्सओएस ६.२ वर कार्यरत असलेल्या इन्फिनिक्सच्या नवीन फोनमध्ये ६.८२ इंच एचडी+ स्क्रीन असून ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो ए-२५ प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. रॅम ३ जीबी व इनबिल्ट स्टोरेज ३२ जीबी आहे. तर, माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. हा स्मार्टफोन ड्युअल सिम कार्ड सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ३.५ एमएम ऑडिओ जॅक, ४जी व्हीओएलटीई, वाय-फाय ८०२.११ ए/बी/जी/एन, ब्लूटूथ ४.२, जीपीएस, माइक्रो-युएसबी यांसारखे फीचर्स आहेत. याशिवाय डीटीएस-एचडी सराउंड साउंड देखील आहे. तसेच फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह तब्बल ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये आहे.


 


फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याती १३ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असून हा कॅमेरा ट्रिपल एलईडी फ्लॅश व डेप्थ सेन्सरला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये एफ/२.० अपर्चरचा, एआय चलित ब्युटी मोड, मल्टिपल कॅमेरा मोड्स उदा. पोर्ट्रेट आणि ‘परफेक्ट’ साठी वाइड सेल्फीचा ८ एमपी सेल्फी कॅमेरा कॅमेरा देण्यात आला आहे. या अत्याधुनिक एआय फ्रेमवर्कमुळे फोनच्या कॅमे-याची क्षमता वाढते, इमेज आपल्या गरजेनुसार अॅडजस्ट करण्यासाठी १० प्रकारच्या मोडद्वारे ऑटो सीन डिटेक्शन फीचर आहे.


 


इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिश कपूर म्हणाले, “ आजच्या काळात घरातील प्रत्येक सदस्य वैयक्तिक गरजांसाठी डिजिटल स्क्रीन्सकडे वळत आहे. त्यामुळे सध्याच्या अनिश्चित काळात स्मार्टफोनवरील अवलंबित्व वाढले आहे. या गरजांमध्ये मनोरंजन, शिक्षण किंवा दैनंदिन व्यवहार इत्यादीचा समावेश आहे. मोठी बॅटरी आणि मोठ्या स्क्रीनचे स्मार्ट 4 प्लससारखे कार्यक्षम डिव्हाइस लाँच करणे ही काळाची गरज आहे. मला खात्री आहे, हे उपकरण वर्क फ्रॉम होम हे न्यू नॉर्मल झालेल्या लोकांसाठी व ज्यांचा स्क्रीन टाइम अचानकपणे वाढला आहे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.