खडकी कटक मंडळास जिल्हा वार्षिक योजनेतून साहित्य खरेदीसाठी २ कोटी २६ लाख ७९ हजार ४०४ रुपयास मंजुरी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*


 पुणे दि.20 :- मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कटक मंडळास कोरोना विषाणू वर प्रतिबंधक आजारावर उपाययोजने साठी आवश्यक साहित्य सामुग्री खरेदी करण्याकरिता रुपये २ कोटी २६ लाख ७९ हजार ४०४ एवढया रकमेस तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.


           कोरोना विषाणू आजार (कोवीड-19) ही जागतिक साथ म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या कोरोना विषाणू (कोवीड-19) या आजाराच्या साथीचा उद्रेक झालेला असून पुणे जिल्हयामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कोव्हिड-19 उपाययोजना नियम 2020 च्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. कोरोना (कोवीड-19) या आजारा विषयीच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आवश्यक औषधे, साधनसामुग्री व यंत्र सामुग्री साहित्य खरेदी प्रक्रिया करण्याकरीता आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्णय प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी तांत्रिक मान्यतेचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीस प्रदान करण्यात आले आहेत. 


           मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी साहित्य सामुग्री खरेदी करताना वित्तीय नियम/खरेदीबाबतचे उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय 1 डिसेंबर 2016 रोजीचा व तद्नुषंगिक शासन निर्णय यामधील तरतुदीचे पालन करावे. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दिनांक 21 मार्च 2020 रोजीच्या निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करण्यात यावा. खरेदी ही हाफकीन अंतर्गत खरेदी कक्ष, बृहन्मुंबई महानगरपालिका, केंद्र शासन उपक्रम-एच एल.एल.लाईफ केअर तसेच अन्य शासन उपकेंद्र के.ए पी.एल.लाईफ केअर, तसेच अन्य राज्य शासनाच्या मेडिकल सर्व्हीस कार्पोरेशनचे दर सुची नुसार करण्यास मान्यता देण्यात येत आहे, वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्रीची आवश्यकता व त्याची तांत्रिक विर्निदेश (टेक्नीकल स्पेसीफिकेशन) हे समितीत असलेल्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या सदस्यांनी शिफारस करणे किंवा ज्या तांत्रिक विनिदेशांना मान्यता आहे (ऑलरेडी अप्रव्हूड) अशीच उपकरणे ही या समितीच्या मान्यतेने खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे, खरेदी करताना आवश्यक ती मागणी, सध्याची उपलब्धता, त्यालगतची शक्यता व साहित्याची व्यवहार्यता तपासणी करुन खरेदी करण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


           जिल्हास्तरीय समितीने ही औषधी, उपकरणे व यंत्रसामुग्री ही कोवीड-19 च्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेल्या आजारावर प्रतिबंधात्मक व उपचारासाठी तसेच अत्यावश्यक व तातडीची बाब म्हणून खरेदी करण्यास आवश्यक असल्याचे प्रमाणित केले असल्याने या खरेदीस तांत्रिक मान्यता देण्यात येत आहे. या प्रस्तावातील सर्व बाबींची खरेदी करणे पूर्वी विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजूरी घेणे बंधनकारक राहील. तसेच शासनाने वेळोवेळी कोविड-19 बाबत प्राप्त विहित तरतुदी, मार्गदर्शक सूचना, परिपत्रके यांचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा यांच्यावर असेल. आवश्यक तया प्रचलित पध्दतीनुसार तांत्रिक मान्यता घेतल्याशिवाय खरेदी प्रक्रिया कार्यरंभ आदेश निर्गमित करण्यात येवू नये, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशीत केले आहे.


*****