*महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेशांसाठी* *पेरा सीईटी 2020 परीक्षा* *31जुलैपासून ऑनलाईन*..... *प्रा. डॉ. मंगेश कराड* .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


कृपया प्रसिद्धीसाठी 8 जुलै 2020


 


महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेशांसाठीपुणे, ता. 08 :- कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने एमएच-सीईटीसंदर्भात (सामान्य प्रवेश परीक्षा) निर्णय पुढे ढकलली आहे. तसेच जेईई सीईटी परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र खासगी विद्य़ापीठांच्या प्रवेश प्रक्रियाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या राज्यातील विविध 19 खासगी विद्यापीठांची संघटना 'पेरा' (प्रिमीयंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) यांनी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पेरा सीईटी - 2020 च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही सीईटी 31 जुलै रोजी सुरू होणार असून 2 ऑगस्ट 2020 रोजी संपणार होणार आहे. या परीक्षांचा निकाल 5 ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि पेरा इंडियाचे उपाध्यक्ष श्री. भारत अग्रवाल यांनी दिली.


 


प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, महाराष्ट्र शासनाने 19 खासगी विद्यापीठांना मान्यता दिली आहेत आणि ती आज राज्यभर कार्यरत आहेत. खाजगी विद्यापीठांच्या कायद्यानुसार सरकारी एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सीईटी व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे एमएच-सीईटी कधी होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी पेरा या खासगी विद्यापीठाच्या संघटनांनी 31 जुलै, 1 आणि 2 ऑगस्ट २०२० रोजी सीईटी - 20 ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेरा सीईटीच्या आधारे विद्यार्थी खाजगी राज्य विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज करून प्रवेश निश्चित करू शकतात.


पेरा सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. पेरा सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 28 जुलै आहे. विद्यार्थ्यांना या सीईटी संदर्भात ऑनलाइन परीक्षा पद्धती समजून घेण्यासाठी 26 व 27 जुलै रोजी मॉक परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उमेदवार घरातूनच ही सीईटी परीक्षेस देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे ही प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन