माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी पाल्यांचे*  *शिष्यवृत्तीचे अर्ज 15 ऑक्टोबर पर्यंत सादर करावेत*                                                     

*माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी पाल्यांचे* 


*शिष्यवृत्तीचे अर्ज 15 ऑक्टोबर पर्यंत सादर करावेत*                                                     


        पुणे, दि. 19:- पुणे जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी ज्यांचे पाल्य सन 2019-20 मध्ये 60% किंवा त्यापैक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी परिक्षा उत्तीर्ण होवून पुढील शिक्षण घेत आहेत अशा सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी त्यांचे पाल्यांचे अर्ज दि. 15 ऑक्टोबर 2020 पूर्वी आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींद तुंगार यांनी केले आहे.                                   


0000