संजय राऊत यांचे 13 वर्षापासून नगरसचिव विभागामध्ये

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


मा.आयुक्त साहेब


पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी पुणे 18


 


महोदय,


उपरोक्त वरील विषयाच्या अनुषंगाने मी आपल्या निदर्शनास असे आणून देऊ इच्छितो की, विरोधी पक्षनेता कार्यालयांमधील कॉम्प्युटर ऑपरेटर श्री संजय राऊत यांचे 13 वर्षापासून नगरसचिव विभागामध्ये वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अनेक वर्ष काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरणा व्हायरसमुळे आयुक्तांचे सर्व विभाग व सर्व पदाधिकारी यांचे कार्यालय मधील AC बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना कॉम्प्युटर ऑपरेटर संजय राऊत AC लावून कार्यालयामध्ये बसत असतात. त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी त्यांचे कामकाज असमाधानकारक असल्याचे अनेक तक्रारी आहेत. श्री संजय राऊत हे नगरसेवकांच्या मर्जीतले म्हणून त्यांची बदली करण्यात येत नसल्याचे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. कम्प्युटर ऑपरेटर संजय राऊत सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांचे कामे करीत नसल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहेत. यासंबंधी पदाधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा ते कामात टाळा टाळ करीत असतात कम्प्युटर ऑपरेटर संजय राऊत हे एक एजन्सीचे एजंट म्हणून महापालिकेमध्ये कामे करत असल्याचे दिसून आलेले आहे. आस्थापना चे कामकाज व पदाधिकारी यांचे कामकाज सोडून ते एजंटगिरी च्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. श्री संजय राऊत मागासवर्गीय कार्यकर्त्यांवर ते अन्यायकारक वागणूक देत असतात त्यांना अशा प्रकारचे कोणतेही अधिकार नसताना विरोधी पक्ष नेता कार्यालयांमधील शिपाई यांच्यावर ते अधिकार गाजवत असतात स्वतःची कामे स्वतः करण्याच्या ऐवजी ते शिपाया मार्फत करून घेतात त्यांच्या मनमानी वागण्यामुळे तेथील शिपाईही संतप्त आहेत. सभाग्रह पक्षनेता कार्यालय ते विरोधी पक्षनेता कार्यालय दरम्यान त्यांच्या कामकाजा वरती अनेक कर्मचारी व कार्यकर्ते व नागरिक त्यांच्यावर शंका उपस्थित करीत आहेत. शहरांमधील लोकप्रतिनिधी यांचे सुद्धा काम करत नसल्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत. अशा कम्प्युटर ऑपरेटर ला महानगरपालिकेला काहीही गरज नसल्याचे सिद्ध होत आहे त्यांचे विरोधी पक्ष नेता कार्यालयांमधून इतर विभागाकडे बदली करण्यात येऊन त्यांचे खातेनिहाय चौकशी हे होण्याची अत्यंत गरज आहे. त्यांच्या कामकाज बाबतीत अनेक नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक असमाधानकारक असल्याचे दिसून आलेले आहे. त्यांचे बदली व चौकशी करण्याचे आदेश तात्काळ आदेश निर्गमित करण्यात येऊन संबंधित कम्प्युटर ऑपरेटर वरती कारवाई करण्यात यावी ही नम्रतेची विनंती.


बाबुराव नवनाथ खळसोडे


माहिती अधिकार कार्यकर्ते पिंपरी चिंचवड