कराड जिल्हा करावा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रति,


मा.प्रांताधिकारी सो


कराड जि.सातारा


यांस..


विषय-: *


–-------------------


*●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●*


 


मा.महोदय,


छावा क्रांतीवीर सेना,कराड तालुक्याच्या वतीने आपणास निवेदन असे की,


देशाचे माजी उपपंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे


पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार,


आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा कराड तालुका, हा 'कराड जिल्हा' झालाच पाहिजे.तसेच यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यापासून कराड तालुक्यातील सर्व जनतेची मागणी आहे की,


कराड तालुका हा 'जिल्हा' व्हावा.त्या अनुषंगाने आता महाराष्ट्रातील इतर तालुके जिल्हा होण्याच्या स्थितीत आहे तरी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यापासून जी मागणी होती,तरी येत्या काळात ती पूर्ण व्हावी व यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्वप्न कराड तालुका हा "कराड जिल्हा" होण्याचे पूर्ण झाले पाहिजे.


अशी कराड तालुक्यातील सर्व जनतेची मागणी आहे.


महाराष्ट्राच्या निर्मितीपासून प्रतिक्षेत असलेला,प्रचंड मोठी राजकीय व भौगोलिक पार्श्वभूमी असलेला,कराड जिल्हा झालाच पाहिजे.कराडमधील कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम कराड येथे झाल्यामुळे त्याला प्रीती संगम म्हणुन ओळखले जाते.


हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.उपजिल्हा रुग्णालय आहे, दळणवळणाच्या सर्वात मोठ्या सोई म्हणजे रेल्वे व विमानतळ आहे,कोकण,कोल्हापूर,सांगली, सोलापूर,पूणे यामध्ये कराड हे केंद्रस्थानी आहे,पुण्यानंतर सर्वाधिक महसुली उत्पन्न कराड तालुक्याचे आहे.तरीही कराड जिल्हा का करत नाही....??


सातारा जिल्ह्यातील दाव्यांचा भार कमी करण्यासाठीच कराडला वेगळे उपजिल्हा न्यायालय आहे,परराज्यातून व परदेशांतून येणा-या लोकांसाठी सर्व त्या शैक्षणिक व रहिवासी सुविधा आहेत,साता-यावरील असलेला प्रचंड भार कमी करण्यासाठी वेगळे वाहतुक कार्यालय आहे. कराडचे नवनिर्वाचित उभे केलेले आर.टी.ओ. चे पासिंग हे MH - 50 या नावाने कराडची ओळख आहे.तरीही कराड जिल्हा का करत नाही.....??


ज्यामुळे जगातील अनेक शास्त्रीय बुध्दीवंत व पर्यटक नजिकच्या काळात कराडला भेट देतील असे जगातील एकमेव भूकंप संशोधन केंद्र आहे.त्यामुळेच व परिसरातील शेतीमाल,आंबे,मासे यांना आंरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कराड विमानतळाचा विस्तारही प्रस्तावित आहे.व्यापार - उदीम, शिक्षण,महसूल,या क्षेत्रात इतरांपेक्षा कायमंच कराड वरचढ राहिले आहे.सहकार क्षेत्रांतील राज्याचे कायदे तर कराडनेच बनवले आहेत.कराडने देशाला, राज्याला व सातारा जिल्ह्याला कायम केवळ विचारच नव्हे तर कल्पक,प्रभावी व खंबीर नेतृत्व दिले आहे.तरीही कराड जिल्हा का करत नाही.....??


जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक(५५%) महसुली उत्पन्न कराडचे आहे,शासकीय भरणा कराडचा आहे,पाऊसमान चांगले असल्याने शेतीचे उत्पन्नही चांगले आहे.या बळावरच मरळी,कृष्णा व सह्याद्री साखर कारखान्यांचा आदर्श राज्यभर राबविला जातो. इतरांसारखी शासनाने दुष्काळी जाहीर करण्याची वेळ कराडवर कधीही आलेली नाही.तरीही कराड जिल्हा का करत नाही.....??


आदिलशाहीत,छत्रपती शिवरायांच्या काळात,पेशवाईत व त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यापासून विजापूरपर्यंत कराड हाच प्रांत असल्याचे ऐतिहासिक पुरावे आजही उपलब्ध आहेत, तशा खाणाखुणाही अजून आहेत.तरीही कराड जिल्हा का करत नाही.....??


कराड हा दोन तालुक्यांचा एक तालुका आहे.राज्यातील सर्वात मोठी पंचायत समिती सदस्य संख्या (२६) कराडची आहे. मसूर,उंब्रज,मलकापूर ही कराड तालुक्यातील गांवे राज्यातील ब-याच तालुका ठिकाणांपेक्षा मोठी आहेत.आता तीच तालुका होण्याच्या तयारीत आहेत. कराडला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव हे तालुकेही जवळ असल्यामुळे ते जोडण्यात यावे तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने कराड तालुका हा खूप मोठ्ठा आहे


त्यामुळे कराडला स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करावा,ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून कराड तालुक्यातील जनतेची आहे.


तरीही कराड जिल्हा का करत नाही.....??


नवीन झालेले,कराडच्या तहसीलदारांचे प्रशासकीय कार्यालय हे साता-याच्या विद्यमान जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा मोठे आहे, कदाचित... व्यापच तेवढा मोठा आहे.नवीन जिल्ह्यांना 'महसुली जिल्हे' असेच शासकीय भाषेत म्हटले जाते आणि त्याच महसुलात लांब पुढे असुनही...तरीही कराड जिल्हा का करत नाही.....??


केवळ राजकीय पातळीवर चेपवण्यासाठीच व लहान दाखविण्यासाठीच कराडवर अनेक वर्षे हा अन्याय होत आहे. खूप जुन्या काळापासून अशांत म्हणून प्रसिध्द असलेले कराड, मागील काही काळापासून ती कात टाकून शांत झाले आहे.पण देशाला,राज्याला विचार देणा-या,नेतृत्व देणा-या कराडला असहकाराचा,आंदोलनाचा विचारही आता करावाच लागेल. कारण आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे व कराड तालुक्यातील सर्व जनतेच्या स्वप्नातील,


"कराड हा जिल्हा" झालाच पाहिजे.....


अशी आपणास विनंती आहे.


सदरील मागणीचे निवेदन हे..


*मा.काकासाहेब जाधव* 


शिवसेना कराड उपतालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली..


मी सागर भारत साळुंखे


अध्यक्ष कराड तालुका त्याचबरोबर,रोहित पंडित सुतार,विशाल डोंगरे,कृष्णत तुपे,अक्षय खाडे,सुजित लादे,सिद्राम कसकी,अजिंक्य कांबळे,सागर शिंदे आम्ही सर्वजण..


छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने आपणाकडे करीत आहोत


*●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●*


      आपला*


 *सागर भारत साळुंखे*


  *छावा क्रांतीवीर सेना,कराड तालुका*


                       


Popular posts
बंड गार्डन पाेलिस निरीक्षक मा. अमाेल काळे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ; साहेबांना कोरोना योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले
Image
न्यू आर्या फाऊंडेशनच्यावतीने समाजाला आधार देण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Image
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील
Image
💃🏻*Traditional Kanchipuram at its finest and most classic
Image
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, काँग्रेस भवन मध्ये आज महत्वपूर्ण बैठक संपन्न...
Image