२० जुलैपासून 'सावित्रीजोती' या मालिकेचे नवीन भाग सुरू - सोमवार-शनिवार संध्या. ७:३० वा.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


'सावित्रीजोती - आभाळाएवढी माणसं होती' या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत सावित्रीबाई आणि जोतीराव फुले या दांपत्याच्या सहजीवनाचा प्रवास दाखवला आहे. अश्विनी कासार हिने सावित्रीमाईंची तर ओम्‌कार गोवर्धन याने जोतीरावांची भूमिका या मालिकेत साकारली आहे. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून सावित्रीजोती या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. येत्या २० जुलैपासून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 


 


जोतीरावांचं शिक्षण, त्यांनी समाजात बदल घडवून आणण्यासाठी केलेली धडपड, त्यांना मिळालेली सावित्रीमाईंची साथ; हे सर्व या मालिकेत पाहायला मिळणार आहे. स्त्रियांना कोणतेही स्वातंत्र्य नसलेल्या काळात सावित्रीबाई स्वतः शिकल्या व पहिल्या स्त्री-शिक्षिका झाल्या. क्रांतीसाठी शास्त्र आणि शस्त्र यांपैकी जोतीराव काय निवडणार, त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक प्रवास कसा होणार, सावित्रीमाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कशा उभ्या राहणार; हे सर्व येत्या भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


 


पाहा, 'सावित्रीजोती - आभाळाएवढी माणसं होती' या मालिकेचे नवीन भाग २० जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.