लॉकडाऊनदरम्यान अभिनेत्री अदिती येवलेच्या रेसिपी टिप्स ...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सध्या लॉकडाऊन मुळे चित्रपट व्यवसाय ठप्प आहे. चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण देखील थांबले आहे, अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांच्या संपर्कात राहताना दिसतात. रुंजी, एक नंबर, कुलस्वामिनी अश्या अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अभिनेत्री अदिती येवले देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे, विविध पदार्थांच्या रेसिपी ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर करताना दिसते. अभिनयाबरोबरच तिला विविध रेसिपी बनवायला आवडतात. वेलकम जिंदगी, विकून टाक, नेबर्स अश्या चित्रपटांमधून देखील तिने आजवर महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.