विषयः मालमत्ता कर सवलतीने भरण्यासाठी शेवटचे ४ दिवस शिल्लक

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


.


 


दिनांक २६/०६/२०२०


 


४,४१.६२१ मिळकतधारकांनी जमा केला रक्कम रु. ५५८.४६ कोटी मिळकत कर.


 


> सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४,४१,६२१ इतक्या मिळकत धारकांनी रक्कम रु.५५८,४६ कोटी इतका मालमत्ता कर जमा केला आहे.


 


- विशेष म्हणजे या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लॉक डाऊन असूनही महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाप्रमाणे online पद्धतीने जास्तीत जास्त मिळकत कर जमा झाला आहे.


 


> पुणे महानगरपालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १०.५७,७१६ इतकी असून, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची मागणी रक्कम रु. १५११.७५ कोटी इतकी आहे.


 


> यामध्ये जुन्या हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या ९.१३,८५५ इतकी असून, मागणीची रक्कम रु.१३६५.२४ कोटी इतकी आहे.


 


तसेच नवीन समाविष्ट ११ गावाकडील मिळकतींची एकूण संख्या १,४३,८६१ इतकी असून, मागणीची रक्कम रु.१४६.५१ कोटी इतकी आहे.


 


कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात या विषाणूचा प्रसार वाढू नये, तसेच नागरिकांना मालमत्ता कर भरणे सुलभ व्हावे, याकरिता पुणे महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर नागरिकांसाठी मालमत्ता कराची देयके online पद्धतीने उपलब्ध (upload) करून दिलेली आहेत.


 


सदर online payment करण्यासाठी खालील पर्याय / सुविधा उपलब्ध आहेत:


 


NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI - Google Pay, UPI - PhonePe, Post Debit Card, UPI, Pos Credit Card, EBPP, Mobile Wallet, paytm, Amazon Pay, NEFT-RTGS, etc.


 


>


 


दिनांक ०१/०४/२०२० ते दिनांक २६.०५.२०२० अखेर ४,४१.६२१ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु.


 


५५८.४६कोटी इतका मिळकत कर पुणे महानगरपालिकेकडे जमा केलेला आहे.


 


> यामध्ये ३,६१,९०५ इतक्या नागरिकांकडून online I digital प्रणालीद्वारे रक्कम रु.४२१.२३कोटी इतके उत्पन्न महानगरपालिकेस जमा झाले आहेत. याचे प्रमाण ८५% इतके आहे.


> तसेच ३९,२५०इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु.१०५.६० कोटी इतकी रक्कम धनादेशाद्वारे जमा केलेली आहे. तर ४०,४९४ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु.३१.७७ इतकी रोख रक्कम स्वरूपात जमा केलेली आहे.


 


तथापि, online कार्यप्रणाली अस्तित्वात असली तरी, नागरिकांकडून रोख किंवा धनादेशाद्वारे मिळकत कर भरणे बाबत वारंवार विचारणा होत आहे. याकरिता अपवादात्मक परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिकेने CFC (नागरी सुविधा केंद्र) वर मिळकत कराची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी महानगरपालिका कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे. सदर केंद्राची माहिती खालील प्रमाणे:


 


सदर नागरी सुविधा केंद्र पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जबळच्या नागरी सुविधा केंद्रावर दिनांक ११/०५/२०२० पासून सुरु करण्यात आलेली आहे. सदर नागरी सुविधा केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० पर्यत सुरु ठेवण्यात आलेले आहे. या नागरी सुविधा केंद्रावर देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला असून दिनांक ११/०५/२०२० पासून ते २६/०६/२०२० या ४७ दिवसांमध्ये ७२,८६६ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु.


 


१२६.६९ कोटी इतका मिळकत कर धनादेश / रोख स्वरुपात जमा केलेला आहे.


 


त्यानुसार दिनांक २७ व २८जून २०२० रोजी शनिवार व रविवारी सटीचे दिवस असली तरी रोख व धनादेशाद्वारे कर भरू इच्छिणाऱ्या मिळकत धारकांची सोय व्हावी यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील सदर नागरी सुविधा केंद्र सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत सरु ठेवण्यात आले आहे.


 


तरी नागरिकांनी नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही, फार काळ थांबावे लागणार नाही याची दक्षता


 


घेवून सहकार्य करणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.


 


तथापि, नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार असले तरी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, या करिता नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे मालमत्ता कर भरणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.


 


मालमत्ता कर सवलतीने भरण्यासाठी शेवटचे फक्त ४ दिवस शिल्लक राहिले असून, सदर सवलत दिनांक ३०/०६/२०२० अखेर संपुष्टात येणार असल्यामुळे, मिळकतधारकांनी मिळकत कर लवकरात लवकर भरावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


 


पुणे महानगरपालिकेकडून कोरोना विषाणू या साथीच्या रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागत आहे. यासाठी मालमत्ता कराचा भरणा नागरिकांनी वेळेत भरणे बाबतचे आवाहन करण्यात येत आहे.


 


26180 (विलास कानडे) सह महापालिका आयुक्त कर आकारणी व कर संकलन पुणे महानगरपालिका


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image