मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर करा आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर करा 


 सोलापूर, दि. २४ : कोरोना विषाणूने बाधित होणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी नव्या अँटीजेन टेस्टचा वापर करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केल्या.


 


 


  जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली त्या मध्ये त्यांनी या सूचना दिल्या, बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलिस उपायुक्त बापू बांगर, उपायुक्त राजाराम झेंडे, आरोग्य संचालक नंदकुमार देशमुख, कोविड टास्क गटांचे प्रमुख डॉ. दिलीप कदम आदी उपस्थित होते. 


 


       बैठकीच्या सुरवातीस महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी सादरीकरणाद्वारे शहरातील कोरोना बाबतची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शहरातील दाट वस्तीच्या आणि लोकसंख्येच्या भागात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत.


 


 डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले की, शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागातील नागरिकांची अँटीजेन टेस्ट करा. या चाचणीमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे अर्ध्या तासात कळते. त्यामुळे बाधा झालेल्या पण लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना वेगळे काढता येईल आणि त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल. 


 


 शहरातील एकूण 15 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सहा आरोग्य केंद्राच्या अखत्यारित मृत्यूदर जास्त आहेत. या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावरच आता जादा लक्ष दिले जाईल, असे श्री.म्हैसेकर यांनी सांगितले. त्यांनी कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवा म्हणुनही सांगितले. खाजगी दवाखान्यात नियंत्रित दरानेच आकारणी केली जाते का असे यावर लक्ष द्या. डॅशबोर्डवर कोरोना बाधित, आयसोलेशन, क्वारंटाईन कक्षात ठेवलेले रुग्ण अथवा मृत्यू झालेले रुग्णांची माहिती अचूक करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अनिल कारंडे, महिला बाल विकास अधिकारी विजय खोमणे, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, परमेश्वर राऊत आदी उपस्थित होते. 


                                                         0000000


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)