यूनियन बँकेने चौथ्या तिमाहीच्या आर्थिक परिणामांची केली घोषणा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.!  


यूनियन बँकेने चौथ्या तिमाहीच्या आर्थिक परिणामांची केली घोषणा


 


~ जागतिक व्यवसायात वार्षिक ७.६% आणि एकूण ठेव रक्कमेत ८.४% वृद्धीची नोंद ~


 


मुंबई, २४ जून २०२०: युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने आज ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वित्तीय वर्षासाठीचे आर्थिक परिणाम जाहीर केले आहेत. बँकेचा जागतिक व्यवसाय वार्षिक ७.६% नी वाढून मार्च २०२० पर्यंत ७९,७.५८९ कोटी रुपये झाला आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत एकूण जागतिक ठेवीमध्ये वार्षिक ८.४% ची वाढ होऊन ४५,०६६८ रुपये झाले आहे.


 


२०२० वित्त वर्षातील चौथ्या तिमाहितील निव्वळ व्याज उत्पन्न १०.६% नी वाढून २८७८ कोटी रुपये झाले. २०१९ वित्त वर्षातील चौथ्या तिमाहित ते २६०२ कोटी रुपये होते. २०२० वित्त वर्षातील चौथ्या तिमाहित इतर उत्पन्न ५८.६% नी वाढून २०१८ कोटी रुपये होते. २०१९ वित्त वर्षातील चौथ्या तिमाहित ते १२७२ कोटी रुपये होते. २०२० वित्त वर्षातील ४ थ्या तिमाहित ऑपरेटिंग नफा ५३.३% नी वाढून २६५३ कोटी रुपये झाला. २०१९ वित्त वर्षातील चौथ्या तिमाहित तो १७३० कोटी रुपये होता.


 


प्रगतीवरील नफा वित्तवर्ष २०२० मधील ४ थ्या तिमाहित ७.५७% नी वाढला. वित्तवर्ष २०१९ मधील चौथ्या तिमाहित तो ७.५१% होता. ठेवींचे मूल्य २०२० वित्तवर्षातील चौथ्या तिमाहित ५.४६% वाढले. वित्तवर्ष २०१९ च्या चौथ्या तिमाहित ते ५.६६ टक्के होते. खर्च व उत्पन्नाचे गुणोत्तर वित्तवर्ष २०२० मधील चौथ्या तिमाहीत ४५.८२% वाढले. २०१९ च्या चौथ्या तिमाहीत ते ५५.३% होते.