सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेंशन देण्याची व्यवस्था बँकांनी करावी - रिपब्लिकन पक्षाची मागणी 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी


     पुणे :- पुणे,पिंपरी चिंचवड व जिह्यातील महानगर पालिका केंद्र व राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचारी यांना रेड झोन व कन्टेनमेन्ट झोन परिसरातील बँका गेली दोन महिने बंद असल्यामुळे रोख रक्कम काढता आली नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना बँका मार्फत त्वरित पेंशन मिळावी या मागणी करिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A) पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले याबाबत संबंधित शहर बँकांच्या प्रमुखांना आदेश देऊन पेंशन धारकांची पेंशन मिळण्याची व्यवस्था करावी गेली दोन महिने ही पेंशन मिळत नाही ती त्वरित देण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे