कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउन स्थितीमध्ये गरजू व्यक्तींना स्वतःच्या बँकेतील शिल्लक निधी आणि एफ.डी तोडून सहकार्य अन्नदान, सुखा शिधा वस्तू व आरोग्य सुविधेचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउन स्थितीमध्ये गरजू व्यक्तींना स्वतःच्या बँकेतील शिल्लक निधी आणि एफ.डी तोडून सहकार्य अन्नदान, सुखा शिधा वस्तू व आरोग्य सुविधेचे वाटप


 


           कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या स्थितीमुळे हातावरील पोट असणारे मजूर, कर्मचारी,पगारदार,छोटे व्यवसायिक,विद्यार्थी यांचे अतोनात हाल होत आहेत. याची जाण ठेवून पुणे शहरातील वाघोली,धानोरी,विश्रांतवाडी,लोहगाव,कळस, कोथरूड,स्टेशन परिसरातील मजूर,ससून रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक,स्टेशन परिसरातून श्रमिक रेल्वेने जाणारी मजूर या सर्वांसाठी प्रशांत वाघमारे आणि सुरेंद्र चिंतल हे सातत्याने मदत करत देवदूत ठरले आहेत कारण त्यांनी स्वतःच्या बँकेतील शिल्लक असलेला सर्व निधी तसेच स्वतःची बँकेतील असलेली एफ.डी तोडून आलेल्या रकमेने ते गेले तीन महिने झाले अन्नदान, सुखा शिधा वस्तू व आरोग्य सुविधेचे वाटप करीत आहे.


 


    प्रशांत वाघमारे व सुरेंद्र चिंतल मित्रपरिवार हे गेले तीन महिने सातत्याने पुणे स्टेशनहुन परगावी,परराज्यात श्रमिक रेल्वेने जाणाऱ्या मजूर प्रवाशांना अन्नदान,महिलांना सॅनिटरी पॅड, रेल्वेतील लहान मुलांना पोषक खाद्य देत आहेत.ससून रुग्णालय मध्ये सध्या रुग्णांची संख्या भरपूर वाढली असून रुग्णां बरोबर असणाऱ्या नातेवाईकांचे जेवणा विना हाल होऊ नये याकरिता त्यांना देखील सातत्यानेअन्नाचे फुड पॅकेट देत आहेत.


 


, रक्तदान शिबिर घेऊन हे रक्त गरजूंपर्यंत पोहोचवलेले . त्यांनी कोरेगाव पार्क येथील संत गाडगेबाबा वसाहत बरोबरच विविध झोपडपट्ट्यांमध्ये 400 गरजू मजूर परिवारांना सुखा शीधा वस्तूंचे किटचे वाटप केले. या किटमध्ये पाच किलो गहू,पाच किलो तांदूळ,दोन किलो साखर, दोन किलो तूर डाळ,पावशेर चहा पावडर,तेलाचे पाकीट,हळद, मीठ,मिरची,मसाला आणि मुरमुऱ्यांचे पाकीट यांचा समावेश  


 


    या कार्यासाठी त्यांना विक्रम मांगुळकर,मनोज मेहता,परशुराम दोडनावल,अविनाश खरात यांनी विशेष सहकार्य करीत आहेत.


Popular posts
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
गृहनिर्माण संस्थांसाठी ' संकुल सुविधा ' हेल्पलाईनचा प्रारंभ
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*