मनसे विद्यार्थी सेनेच्या मागणीला यश, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फी भरण्यात मिळणार हप्त्याची मुभा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मनसे विद्यार्थी सेनेच्या मागणीला यश, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना फी भरण्यात मिळणार हप्त्याची मुभा


 


कर्जत दि. 24 गणेश पवार


 


         कोरोनाचे संकट हे जगासह देशावर देखील गडद होत आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउन काळात अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. तेव्हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लाखोंच्या घरात असलेली फी भरण्यास जड जाणार आहे. त्यामुळे फी भरण्यात हप्त्याची सवलत द्यावी या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. 


                 कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असलेला दिसून येत आहे. संपूर्ण भारत देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्ण यांचा आकडा मोठा आहे. तर कोरोना या विषाणूवर मात करण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. तेव्हा या विषाणूला रोखण्यासाठी गेले तीन महिने लॉकडाउन करण्यात आलेले आहे. या लॉकडाउन काळात अनेकांच्या हाताला काम नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक उद्योग धंदे बंद पडल्याने घरच्या संसाराचा गाडा ओढायचा कसा या विवंचनेत लोक असताना आता इंजिनिअरिंग शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या मुलांची लाखोंच्या घरात असलेली फी कशी भरायची हा देखील प्रश्न सतावत होता. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कर्जत तालुका सचिव स्वप्नील शेळके व त्यांचे सहकारी राकेश ऐनकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, यासह जिल्हाधिकारी व वरिष्ठांना आगामी शैक्षणिक वर्षात कोणतीही फी वाढ न करता 4 टप्प्यात फी भरण्याची मुभा द्यावी. तसेच फी चा टप्पा भरण्यास पुढे मागे झाल्यास संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेस बसण्यास द्यावे अशी मागणी असलेले निवेदन दिनांक 16 जून रोजी दिले होते. या मागणीचा विचार करत मुंबई विद्यापीठाने हप्त्यात फी भरण्याची मुभा दिल्याचे जाहीर करत. मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांना तसे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मागणीला यश आल्याने विद्यार्थी व पालक वर्गात आनंद पसरला आहे


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)