पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मुंबई, १ जून २०२०: विविध देशांनी मागील आठवड्यात लॉकडाऊन शिथिलीकरणास सुरुवात केल्याने अर्थव्यवस्थेच्या सुधारणेलाही चालना मिळेल या आशेने सोन्याच्या किंमतीत ०.४ टक्क्यांची घसरण दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांनी जोखीमीसाठी असलेल्या संपत्तीला कल दिला आणि पिवळ्या मेटलच्या किंमती घसरल्या.
चीनने हाँगकाँगमध्ये कठोर आणि प्राचीन सुरक्षा मानंदडांच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव ठेवल्याने अमेरिका आणि चीन यांच्यात नव्याने तणाव निर्माण झाला. राष्ट्राधध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आणि हाँगकाँगमध्ये व्यापक निषेध व्यक्त झाला. या घटकांचाही सोन्याच्या किंमती घसरण्यावर परिणाम झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली. त्या ३.८४ टक्क्यांनी वाढून १७.८ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरीरल किंमती ३.६८ टक्क्यांनी वाढून ५०,११८ रुपये प्रतिकिलोवर बंद झाल्या.
मागील आठवड्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागणी वाढल्याच्या आशा व्यक्त करत चीनबरोबरचा फेज वनमधील व्यापार करार रद्द केला नाही, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती ६.७ टक्क्यांनी वाढल्या. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलिअम एक्सपोर्टिंग नेशन्स (OPEC) या संघटनेतील सदस्यांमध्ये जून आणि जूलै महिन्यात आक्रमकरित्या उत्पादन कपात सुरूच ठेवायची की नाही, हे ठरवण्यासाठी बैठक नियोजित करण्यात आली आहे. तथापि, उत्पादन कपातीस रशियाने नकार दिल्यामुळे भविष्यातील निर्णयावर याचा दूरगामी परिणाम होईल