*"पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*मुंबई :-* सुरुवातीला दाऊदच्या सुरक्षा रक्षकांला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चा कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत आहे.
दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. मात्र, सरकारने याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.पाकिस्तानमधील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दाऊदला करोना झाल्याचे वृत्त दिले जात होते. दाऊद ला कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पाकिस्तान वृत्तद्वारे सांगण्यात आले. मात्र आज त्याच्या मृत्यूची अफवा पसरली आहे.
जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना संसर्गाने पाकिस्तान मध्ये अनेकांना बाधित केले आहे. कोरोनाची लागण सुरुवातीला दाऊदच्या सुरक्षा रक्षकांना आणि त्यानंतर दाऊद आणि त्याच्या पत्नीलाही झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दाऊदला कराचीतील मिलिट्री रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मीडियात पसरली. परंतु दाऊद चा उजवा हात असणाऱ्या अनिस अहमदने या सर्व बातम्या फेटाळून लावल्याचे वृत्त एएनआयएने दिले आहे. त्याने दाऊद अथवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही कोरनाची लागण नसल्याचे सांगितले आहे.