ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांना*.... उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांना*


*


ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी साहेबांचं निधन हे माझ्यासारख्या असंख्य चित्रपटरसिकांसाठी मोठा धक्का आहे. मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातही रंजकता असते. त्यांच्यातही ‘हिरो’ लपलेला असतो आणि तो लोकांना आवडू शकतो हे बासू चटर्जी साहेबांनी दाखवून दिलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले उस पार, चितचोर, पिया का घर, खट्टा मिठा, रजनीगंधा, छोटीसी बात, एक रुका हुवा फैसला, चमेली की शादी, बातों बातो में सारखे चित्रपट हे भारतीय चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून ते आपल्याला सदैव निखळ आनंद देत राहतील. बासू चटर्जी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.


*--


अजित पवार,


उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.*