जिल्हा वार्षिक योजना निधीतून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश.... मा. नवल किशोर राम जिल्हाधिकारी पुणे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**


जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला भोर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा


 


पुणे दि.24 : - पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील आरोग्य विषयक पायाभुत सुविधांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे सांगतानाच आपत्ती व्यवस्थापन निधी, जिल्हा वार्षिक योजनेचा निधी आणि सीएसआर निधीतून आरोग्यविषयक सुविधांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.


          भोर पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी आमदार संग्राम थोपटे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार अजित पाटील, भोरचे पोलीस निरिक्षक श्री.मोरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे,पंचायत समिती सदस्य रोहन बाठे आदी उपस्थित होते.


       जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. भोर येथे प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकलो, असे त्यांनी सांगितले. तसेच भोर तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनास यापूर्वी सहकार्य केले तसेच यापुढील काळात देखील असेच सहकार्य करावे असे सांगून नागरिकांचे कौतुक केले.


        भोर उपजिल्हा रुग्णालयातील सोईसुविधांचे तातडीने बळकटीकरण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे सांगून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेत नियोजन करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या बाहेरील नागरिकांच्या विलगीकरणासंदर्भात सूचना करुन कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जनजागृती करण्यात यावी. असे सांगितले. भोर उपजिल्हा रुग्णालयाकरीता ऑक्सीजन सुविधा, तसेच इतर अत्यावश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन दिल्या जातील. भोर सारख्या दुर्गम भागात त्याचठिकाणी रुग्णांवर सर्व प्रकारचे उपचार होतील याकरीता आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापर तसेच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आवश्यक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करुन राष्ट्रीय महामार्गासंदर्भांतील अडीअडचणीचांही आढावा घेतला. तसेच खरीप हंगामातील खते, बियाणे वाटप स्थितीचा आढावा घेवून याचा तुटवडा भासणार नाही यादृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.


   आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रीय महामार्गावरील शिवापूर येथील टोलनाका, भोर- वेल्हा तालुक्यातील शेतक-यांना खते, बि बियाण्यांचा पुरवठा, शेतीसाठीचा युरियाचा पुरवठा याबाबतच्या सूचना करुन पीककर्ज, विद्युत विभागांच्या प्रश्नांबाबत या बैठकीत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी याबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येवून या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.


     0 0 0 0


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image